Hardik Pandya : बिझनेसमध्ये भावानेच हार्दिक पांड्याला फसवलं, अखेर झाली अटक

Hardik Pandya : व्यावसायिक स्तरावर हार्दिक पांड्या सध्या अडचणींचा सामना करतोय. हार्दिक पांड्या नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्स टीमची IPL 2024 मध्ये खराब सुरुवात झाली आहे. मुंबईने पहिले तिन्ही सामने गमावेल. त्यानंतर चौथा सामना जिंकला. मुंबई इंडियन्ससाठी यापुढचे सगळेच सामने महत्त्वाचे आहेत. एकही पराभव परवडणारा नाहीय. त्यात आता हार्दिक पांड्याला व्यक्तीगत पातळीवर धक्का बसलाय.

Hardik Pandya : बिझनेसमध्ये भावानेच हार्दिक पांड्याला फसवलं, अखेर झाली अटक
hardik pandya,
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 11:14 AM

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या आधीच अडचणींचा सामना करतोय. मुंबईच्या टीमची सूत्र हाती घेतल्यापासून त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. त्यात यंदाच्या सीजनची टीमसाठी सुरुवात चांगली झालेली नाही. मुंबई इंडियन्सने तिन्ही सामने गमावून पराभवाची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एकमेव विजय मिळवला. पाच सीजन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या स्थितीसाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरल जातय. त्यातच व्यक्तीगत आघाडीवर हार्दिक पांड्यासाठी एक वाईट बातमी आहे. हार्दिक पांड्याच्या मोठ्या चुलत भावाला फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे. हार्दिक आणि क्रृणाल पांड्याला फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 4.3 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. हार्दिक आणि क्रृणालची फसवणूक केल्याप्रकरणी वैभव पांड्याला अटक करण्यात आलीय.

हार्दिक पांड्या, क्रृणाल पांड्या आणि वैभव पांड्या तिघांनी मिळून एक कंपनी स्थापन केली होती. हार्दिक आणि क्रृणाला दोघांचे त्या कंपनीत 40 टक्के शेअर होते. वैभवचे 20 टक्के शेअर होते. आता वैभव पांड्याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. 2021 मध्ये तिघांनी मिळून पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. वैभवने नंतर स्वत:चाच पॉलिमरचा व्यवसाय सुरु केला. त्याने हार्दिक आणि क्रृणालला या बद्दल काही कळवलं नाही. पैशांच्या अफरातफरीसह नियमांच उल्लंघन केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय.

जसं ठरवलय तशा गोष्टी घडत नाहीयत

IPL 2024 चा सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये परतला. सध्या तो मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे. रोहित शर्माला हटवून त्याच्याजागी हार्दिकला कॅप्टन बनवण्यात आलं. पण मुंबईसाठी अजून जसं ठरवलय तशा गोष्टी घडत नाहीयत. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. पहिले तिन्ही सामने मुंबईच्या टीमने गमावले आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.