Prithvi Shaw Triple Century: पृथ्वीकडे अजून किती दुर्लक्ष करणार? रणजीत 6 वर्षात झालं नाही, ते करुन दाखवलं
Prithvi Shaw Triple Century: Ranji Trophy मध्ये पृथ्वीची वनडे स्टाइल बॅटिंग, फक्त इतक्या चेंडूंमध्ये त्रिशतकी झेप
नवी दिल्ली: मुंबईचा अव्वल प्लेयर पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रणजी ट्रॉफी मॅचमध्ये त्याने आसामच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. आसामच्या टीमला पृथ्वी शॉ च्या बॅटचा चांगलाच तडाखा बसला. पृथ्वीने या मॅचमध्ये त्रिशतक झळकवून फर्स्ट क्लास क्रिकेटमधील मोठी धावसंख्या उभारली आहे. सामना रणजीचा असला, तरी पृथ्वी शॉ ने पूर्णपणे वनडे स्टाइल बॅटिंग केली. त्याने 326 बॉलमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकवली.
पृथ्वीने काल किती धावा केल्या?
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आणि आसाममध्ये सुरु असलेल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पृथ्वी शॉ काल 240 धावांवर नाबाद होता. आज सकाळी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दुसऱ्यादिवशी सकाळी त्याने पुढच्या 60 धावा इतक्या वेगाने केल्या की, कधी त्रिशतक झालं, ते कळलच नाही.
6 वर्षानंतर कमाल करणारा पहिला बॅट्समन
मागच्या 6 वर्षात रणजी ट्रॉफी स्पर्धेत जे झालं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करुन दाखवली आहे. 2017 नंतर देशांतर्गत क्रिकेटमधील या मोठ्या फॉर्मेटमध्ये त्रिशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलाय. कमाल म्हणजे, पृथ्वी शॉ ची इनिंग जशी पुढे जातेय, तसा त्याचा स्ट्राइक रेट पण वाढतोय. तो गियर बदलून टी 20 अंदाजात खेळताना दिसतोय.
इनिंगसोबत स्ट्राइक रेटही वाढतोय
पृथ्वी शॉ ने आसाम विरुद्ध शतक 107 चेंडूत झळकवल. डबल सेंच्युरीसाठी तो 128 चेंडू खेळला. म्हणजे 235 चेंडूत त्याने द्विशतक झळकावलं. ट्रिपल सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी त्याने फक्त 91 चेंडू घेतले. शॉ ची ट्रिपल सेंच्युरी 326 चेंडूत पूर्ण झाली. असाच खेळत राहिला, तर रेकॉर्ड मोडले जातील
पृथ्वी शॉ अजूनही मैदानात आहे. आसामसाठी ही बातमी चांगली नसेल, पण क्रिकेट फॅन्सचा आनंद नक्कीच वाढवणारी आहे. पृथ्वी आता जितका खेळेल, तितके आणखी रेकॉर्ड मोडले जातील. आज तो पूर्ण दिवस खेळला, तर तो 500 च्या आकड्यापर्यंतही पोहोचू शकतो.