मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकच्या नावाने घोषणाबाजी, LIVE मॅच मध्ये फॅन्ससमोर हात जोडले, पहा VIDEO
मुरली विजयकडे (Murali Vijay) कसोटीचा फलंदाज (Test batsman) म्हणून पाहिलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मुरली विजय आता लांब आहे. पण अजूनही क्रिकेटच्या मैदानात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय.
मुंबई: मुरली विजयकडे (Murali Vijay) कसोटीचा फलंदाज (Test batsman) म्हणून पाहिलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून मुरली विजय आता लांब आहे. पण अजूनही क्रिकेटच्या मैदानात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. अलीकडेच मोठ्या ब्रेक नंतर मुरली विजयने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं. तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये शानदार सेंच्युरी ठोकली. मुरली विजय सध्या याच लीग मध्ये खेळतोय. या स्पर्धेत एका सामन्यादरम्यान मुरली विजयला चाहत्यांसमोर हात जोडावे लागले. व्यक्तीगत जीवनातील एका घटनेबद्दल चाहते मुरली विजयला डिवचण्याचा प्रयत्न करत होते.
मुरली विजयसमोर कार्तिकच्या नावाने घोषणाबाजी
TNPL मधील एका सामन्यात मुरली विजय समोर मुद्दामून डीके-डीकेच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुरली विजय थोडा अस्वस्थ झाल्याचं दिसलं. मुरलीला चाहत्यांसमोर हात जोडावे लागले. मुरली विजयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुरली विजय त्यावेळी सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. त्याचवेळी काही चाहते डीके-डीकेच्या घोषणा देत होते. हे सर्व ऐकून मुरली विजयने त्यांच्यासमोर हात जोडले.
मुरली विजयने हात का जोडले?
दिनेश कार्तिकच नाव पुकारताच मुरली विजयने हात का जोडले? त्यामागे एक कारण आहे. मुरली विजयने दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता बरोबर लग्न केलय. मुरली विजय बरोबर विवाहबाह्य प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दिनेश कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला. त्यानंतर दिनेश कार्तिकने स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल बरोबर लग्न केलं. दीपिकाने अलीकडे जुळ्या मुलांना जन्म दिला.
#TNPL2022 DK DK DK …… Murali Vijay reaction pic.twitter.com/wK8ZJ84351
— Muthu (@muthu_offl) July 7, 2022
कोणाविरुद्ध मुरली विजयने ठोकलं शतक?
मुरली विजयने तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये शतक ठोकलं होतं. तो नेल्लई रॉयल्स विरुद्ध 121 रन्सची इनिंग खेळला. मुरली विजयने 12 षटकार आणि 7 चौकार लगावले. चाहत्यांनी दिनेश कार्तिकच्या नावे घोषणाबाजी करुन मुद्दाम मुरली विजयला डिवचलं. त्यामुळे सोशल मीडियावर विजय पुन्हा एकदा ट्रोल होतोय.