Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023: धोनीने ज्याला टीमबाहेर केलं, त्यालाच ऑक्शनमध्ये मिळू शकतात कोट्यवधी रुपये

IPL 2023: देशांतर्गत क्रिकेटमध्ये या खेळाडूने धुमाकूळ घातलाय.

IPL 2023: धोनीने ज्याला टीमबाहेर केलं, त्यालाच ऑक्शनमध्ये मिळू शकतात कोट्यवधी रुपये
Dhoni-Jadeja Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 4:19 PM

मुंबई: आयपीएलच्या पुढच्या सीजनआधी मिनी ऑक्शन होणार आहे. यात युवा आणि अनुभवी खेळाडूंना विकत घेण्याचा फ्रेंचायजी प्रयत्न करतील. ऑक्शनसाठी आता फक्त काही दिवस उरलेत. त्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक असलेला प्रत्येक खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. असाच एक प्लेयर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलाय. त्याला या सीजनआधी रिलीज करण्यात आलं. तो आता देशातंर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतोय.

किती खेळाडूंवर लागणार बोली?

आयपीएल 2023 मिनी ऑक्शनच्यावेळी एकूण 87 स्लॉट आहे. त्यावेळी 405 खेळाडूंवर बोली लागेल. अनुभवी आणि राष्ट्रीय टीममध्ये खेळलेल्या खेळाडूंशिवाय काही अनकॅप्ड प्लेयर्स सुद्धा आहेत. त्यांना विकत घेण्याचा 10 फ्रेंचायजी प्रयत्न करतील. यात एक विकेटकीपर फलंदाज नारायण जगदीशन आहे. मिनी ऑक्शनआधी जगदीशनला चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केलं.

2020 पासून तो CSK सोबत होता

जगदीशन 2020 साली चेन्नई सुपर किंग्जमध्ये होता. मागच्या सीजनमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टीममध्ये तो होता. पण तीन वर्षात त्याला फार कमी संधी मिळाली. या दरम्यान सीएसकेसाठी तो फक्त 7 मॅच खेळला. याच कारण धोनी विकेटकीपर असणं आहे. जगदीशन विकेटकीपर म्हणून खेळतो. त्यामुळे त्याला फार कमी संधी मिळाल्या. त्यानंतर त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तामिळनाडूच प्रतिनिधीत्व करतो. नारायण जगदीशनची बॅट सध्या धुमाकूळ घालतेय. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमाल केली. रणजी ट्रॉफीमध्येही शतक झळकावलं. हैदराबाद विरुद्ध ग्रुप-बी च्या एलिट मॅचमध्ये दुसऱ्यादिवशी तो नाबाद 116 धावांची इनिंग खेळला. दिवसाचा खेळ संपताना जगदीशनने 95 चेंडूत 16 चौकार आणि 3 षटकारांसह 116 धावा केल्या. त्याआधी त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक 277 धावा केल्या होत्या.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सलग 5 शतक

जगदीशनने रणजी ट्रॉफीच्या आधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमालीच प्रदर्शन केलं. त्याने सलग पाच शतकं झळकवली. अरुणाचल विरुद्ध मॅच दरम्यान त्याने 277 धावा केल्या. लिस्ट ए मधील या सर्वाधिक धावा आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 138 च्या सरासरीने 830 धावा फटकावल्या. जगदीशन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय. 23 डिसेंबरला होणाऱ्या ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. त्याने अजून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यु केलेला नाही.

नवी मुंबईत होणार “महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार”
नवी मुंबईत होणार “महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार”.
राज्याच्या महाबजेटमध्ये जलयुक्तशिवारासंदर्भात अजितदादांची मोठी घोषणा
राज्याच्या महाबजेटमध्ये जलयुक्तशिवारासंदर्भात अजितदादांची मोठी घोषणा.
गडचिरोलीला “स्टील हब” होणार, तर नागपूरला “अर्बन हाट केंद्र“ येणार..
गडचिरोलीला “स्टील हब” होणार, तर नागपूरला “अर्बन हाट केंद्र“ येणार...
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांची तूफान डायलॉगबाजी
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अजितदादांची तूफान डायलॉगबाजी.
नागपुरात तरुणीकडे पाहून भर रस्त्यात तरूणानं नको ते केलं, VIDEO व्हायरल
नागपुरात तरुणीकडे पाहून भर रस्त्यात तरूणानं नको ते केलं, VIDEO व्हायरल.
राज्याच्या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांसाठी काय घोषणा?
राज्याच्या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांसाठी काय घोषणा?.
'त्या' हत्येची मुंडेंकडे पूर्ण माहिती? जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा
'त्या' हत्येची मुंडेंकडे पूर्ण माहिती? जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा.
त्याच्या डेरिंगला सलाम आहे, आव्हाडांकडून राज ठाकरेंचं कौतुक
त्याच्या डेरिंगला सलाम आहे, आव्हाडांकडून राज ठाकरेंचं कौतुक.
'राज ठाकरेंचं अभिनंदन, बोलायला हिंमत लागते...'. आव्हाडांकडून मिमिक्री
'राज ठाकरेंचं अभिनंदन, बोलायला हिंमत लागते...'. आव्हाडांकडून मिमिक्री.
.. तर एव्हाना आमच्या निषेधाचे मोर्चे निघाले असते; राऊतांचा भाजपवर टोला
.. तर एव्हाना आमच्या निषेधाचे मोर्चे निघाले असते; राऊतांचा भाजपवर टोला.