IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी विराटचा ‘हा’ निर्णय संघाला जिंकवू शकतो, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा सल्ला
पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर दुसरी कसोटी भारताने तर तिसरी कसोटी इंग्लंडने जिंकली आहे. त्यामुळे स्पर्धेत सध्या दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहेत. या सर्वामुळे आता चौथा सामना महत्त्वाचा आणि चुरशीचा असणार आहे.
Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने लॉर्ड्वर अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. त्यानंतर भारतीय संघ हेंडिग्ले येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत(India Vs England, 3rd Test) देखील तशीच कामगिरी करेल असे वाटत होते. पण भारताला एक डाव आणि 76 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने चौथ्या कसोटीत मात्र भारताला चांगली रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने (Naseer Hussain) भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) चौैथ्या कसोटीत विजयासाठी एक सल्ला दिला आहे. नासिरच्या मते अंतिम 11 मध्ये रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला खेळवणे गरजेचे आहे. ओवलच्या मैदानाची स्थिती पाहता आश्विन सर्वात फायदेसीर गोलंदाज ठरु शकतो.
अश्विनने त्याचा भारतीय संघातून शेवटचा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही कसोटी सामन्यात आश्विन बेंचवर बसून आहे. त्यामुळे चौथ्या कसोटी त्याला खेळवण्याबाबत काय निर्णय होईल. हे पाहावे लागेल.
यासाठी संधी मिळायला हवी
नासिरने आश्विनला खेळवण्याबाबत सांगितल की, ”इंग्लंड संघात अनेक डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे या सर्वांविरुद्ध आश्विनची गोलंदाजी प्रभावी ठरली असती. तर दुसरीकडे मागील काही काळांपासूनचे आश्विनचे रेकॉर्डशी शानदार आहे. जगातील नंबर 2 चा फिरकीपटू असणारा आश्विन फलंदाजीतही चांगली कामगिरी करतो. त्यामुळे त्याने संघात असायलाच हवं.”
भारत आणि ओवलचं मैदान
चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणाऱ्या ओवलच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात 12 वेळा कसोटी सामने खेळवले गेले आहेत. ज्यात चार वेळा इंग्लंडने तर एका वेळेस भारताने विजय मिळवला आहे. याशिवाय 7 सामने अनिर्णीत सुटले आहेत. विशेष म्हणजे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना याच मैदानावर 1936 मध्ये खेळवला गेला होता. ज्यात इंग्लंडने नऊ विकेट्सनी विजय मिळवला होता. तर या मैदानावर अखेरचा सामना 2018 साली खेळवला गेला असून यातही इंग्लंडनेच 118 धावांनी विजय मिळवला आहे. तसंच दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेने त्याच्या कारकिर्दीत ठोकलेल्या एकमेव शतकाच्या जोरावर 2007 साली भारताने ओवलच्या मैदानावर 664 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी दिनेश कार्तिकने 91, राहुल द्रविडने 55, सचिन तेंडुलकरने 81, लक्ष्मणने 51 आणि महेंद्र सिंह धोनीने 92 धावांची खेली खेळी होती.
हे ही वाचा
भारतीय संघाकडून सलामीचा सामना, मग पाकिस्तान संघातून खेळला, भारताला पराभूत करण्यातही मोठा वाटा
CPL च्या सामन्यात पंचावर भडकला पोलार्ड, राग व्यक्त करण्यासाठी मैदानात केले असे काही, पाहा VIDEO
(Naseer hussain advices virat to call ravichandran ashwin for wining fourth test at the oval)