नताशाच्या इन्स्टा स्टोरीनेही उडवली एकच खळबळ, घटस्फोटाच्या प्रश्नावर अशी दिली प्रतिक्रिया
हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या तशा अफवा पसरत आहेत. याबाबत आज जेव्हा मुंबईत काही पत्रकारांनी नताशा हिला घटस्फोटांच्या अफवा बाबत विचारले तेव्हा तिची प्रतिक्रिया फार वेगळीच होती. यावरुन काय संकेत मिळत आहेत.
नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. पण यादरम्यानच पहिली प्रतिक्रिया नताशाकडून आली आहे. मुंबईत पत्रकारांनी याबाबत तिला प्रश्न विचारला असता नताशाची प्रतिक्रिया खूपच आश्चर्यकारक होती. तिने कोणतेही स्पष्ट उत्तर यावर दिलेले नाही. पण तिची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभावातून बरेच काही स्पष्ट होत होते. हार्दिक पांड्या आणि नताशाच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. नताशाने तिच्या इन्स्टा हँडलवरून पांड्या आडनाव काढून टाकले आहे. याशिवाय तिने हार्दिकसोबतचे फोटोही डिलीट केले आहेत.
या व्हिडिओमध्ये नताशा तिच्या एका मित्रासोबत दिसत आहे. या दरम्यान एका पत्रकाराने तिला विचारले की घटस्फोटाच्या अफवांवर तिला काय म्हणायचे आहे? यावर नताशा कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ती फक्त धन्यवाद म्हणाली आणि हसत पुढे निघून गेली. युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक हार्दिकच्या नशिबाला शिव्या देत आहेत. काही युजर्सनी नताशाच्या या प्रतिक्रियेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
View this post on Instagram
नताशाच्या इन्स्टा स्टोरीनेही एकच खळबळ उडवून दिली आहे. नताशाने ट्रॅफिक सिग्नलचे पोस्टर लावले असून कॅप्शनमध्ये कोणीतरी रस्त्यावर येणार आहे असे म्हटले आहे. हे पोस्टर ड्रायव्हिंग क्लासचा भाग आहे. पण सध्याच्या परिस्थितीत नताशा जे काही बोलते ते तिच्या हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याशी जोडले जात आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की जर नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट झाला तर क्रिकेटरला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के रक्कम तिला द्यावी लागेल. नताशाची नुकतीच इन्स्टा स्टोरी याच्याशी जोडली जात आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा आयपीएलच्या एकही सामन्यामध्ये दिसली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर ती संघाला चीअर करण्यासाठी मैदानावर येईल अशी अपेक्षा होती. पण ती दिसली नाही. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी बळ मिळत आहे. त्यातच तिने आज या प्रश्नावर देखील बोलणं टाळलं आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं दिसतं आहे.