Gujarat Titans IPL 2023 : भर मैदानात हार्दिक पंड्या-आशिष नेहरामध्ये वाजलं, कशावरुन झालं भांडण? VIDEO
Gujarat Titans IPL 2023 : आशिष नेहराने शुभमन गिलच्या शतकाच सेलिब्रेशन सुद्धा नाही केलं. सगळी टीम जागेवर उठून उभी राहिली. पण आशिष नेहरा आपल्या जागेवर बसून होता.
अहमदाबाद : मैदानात आशिष नेहराचा संयम सुटल्याच तुम्ही आतापर्यंत कितीवेळा पाहिलय? खेळाडू म्हणून आतापर्यंत तुम्ही एक-दोनवेळा आशिष नेहराला भडकलेलं पाहिलं असेल. तोच आशिष नेहरा आता गुजरात टायटन्सचा कोच आहे. IPL 2022 मध्ये डेब्यु केल्यापासून गुजरात टायटन्सची टीम जबरदस्त कामगिरी करेतय. चालू सीजनमध्येही प्लेऑफमध्ये दाखल होणारा गुजरात टायटन्स पहिला संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सची मॅच सुरु असताना तुम्हाला आशिष नेहराच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल.
डगआऊटमध्ये असताना नेहराच्या चेहऱ्यावर अस्वस्थततेचे भाव असतात. तो तुम्हाला कॅप्टन हार्दिक पंड्याच्या कानात काहीतरी सांगताना दिसतो किंवा मेंटॉर गॅरी कस्टर्न यांच्याबरोबर त्याची चर्चा सुरु असते.
नेहराचा संयम सुटला
पण सोमवारी क्रिकेट चाहत्यांना एक वेगळा आशिषा नेहरा पहायला मिळाला. लीग स्टेजमध्ये घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळताना गुजरात टायटन्सने आरामात विजय मिळवला. गुजरातची टीम प्लेऑफमध्ये दाखल झाली. पण या मॅचमध्ये आशिष नेहराचा संयम सुटल्याच पहायला मिळालं.
एकवेळ त्यांचे 59 रन्सवर 7 विकेट गेले होते
सनरायजर्स हैदराबादच्या टीमने सोमवारी राजस्थान रॉयल्ससारखा खेळ दाखवला. गुजरातच्या 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी चार विकेट घेतले. एकवेळ त्यांचे 59 रन्सवर 7 विकेट गेले होते. पण अखेरीस SRH टीमने 9 बाद 154 धावा केल्या. हेनरीच क्लासेनने SRH कडून सर्वाधिक 44 चेंडूत 64 रन्स केल्या. गुजरातने 34 रन्सनी विजय मिळवला.
आशिष नेहरा का चिडला?
नेहरा मैदानात वैतागल्याच चित्र पहिल्या इनिंगमध्ये दिसलं. ओपनर वुद्धिमान साहा पहिल्या ओव्हरमध्ये डकवर आऊट झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन दरम्यान दुसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी झाली. गिल आणि सुदर्शन खेळत असताना गुजरातची टीम सहज 200 धावांचा टप्पा ओलांडेल असं वाटत होतं. पण इनिंगच्या अखेरच्या टप्प्यात गुजरातचा डाव कोलमडला. त्यावरुन आशिष नेहरा चिडल्याच दिसलं.
Shubhman Gill hits his maiden IPL hundred❤️ ???? The future of Indian Cricket?? pic.twitter.com/NVVFj3Kl1X
— Tim David Stan ? (@Aatmanirbharboi) May 15, 2023
एकटा आपल्या जागेवर बसून होता
शुभमन गिलने काल आयपीएल करियरमधील पहिली सेंच्युरी झळकवली. त्यावेळी गुजरात टीममधील सगळे सदस्य जागेवर उठून उभे राहिले. टाळ्या वाजवल्या. गिलच कौतुक केलं. फक्त आशिष नेहरा एकटा आपल्या जागेवर बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. गिलच्या शतकाचा आनंद दिसला नाही. कॉमेंटेटरनी सुद्धा या बद्दल आश्चर्य व्यक्त केलं. गुजरात टायटन्सच्या डायरेक्टरचा हस्तक्षेप
मॅचच्या अखेरीस गुजरातचे फलंदाज बेजबाबदार फटके खेळून बाद झाले. त्यावर नेहरा वैतागलेला दिसला. गुजरातची इनिंग संपल्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याबरोबर त्याचं बोलण सुरु होतं. दोघे वैतागल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. गुजरात टायटन्सचे डायरेक्टर विक्रम सोलंकी हार्दिकला शांत करताना दिसत होते.