बलात्काराचा आरोप असलेल्या क्रिकेटपटूला पकडण्यासाठी इंटरपोलकडे मागितली मदत

कोण आहे तो क्रिकेटपटू? त्याच्याविरोधात अटकेच वॉरंट निघालय

बलात्काराचा आरोप असलेल्या क्रिकेटपटूला पकडण्यासाठी इंटरपोलकडे मागितली मदत
Sandeep LamichhaneImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 3:02 PM

मुंबई: नेपाळचा प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप लमिछानेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. नेपाळी कोर्टाने संदीप लमिछाने विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. संदीप लामिछाने सध्या नेपाळमध्ये नाहीय. तो कॅरेबियाई देशामध्ये थांबला आहे. तिथे कॅरेबियाई प्रिमीयर लीग स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.

इंटरपोलकडे मागितली मदत

माझ्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी मी मायदेशी म्हणजे नेपाळमध्ये परतणार आहे, असं संदीप लमिछाने याने सांगितलं आहे. दरम्यान नेपाळ सरकारने त्याला परत आणण्यासाठी इंटरपोलकडे मदत मागितली आहे.

नेपाळच्या टीमचा कॅप्टन

फारर असलेल्या संदीप लमिछानेला शोधून काढण्यासाठी इंटरपोलने मदत करावी, अशी नेपाळ सरकारची मागणी आहे. तो नेपाळच्या राष्ट्रीय टीमचा कॅप्टन होता. बलात्काराच्या आरोपानंतर त्याला निलंबित करण्यात आलं.

सदस्य देशांकडे मागितली मदत

संदीप लमिछाने विरोधात इंटरपोलने रविवारी डिफ्यूजन नोटीस जारी केली आहे. सदस्य देशांकडे या आरोपी क्रिकेटरला शोधून काढण्यासाठी मदत मागितली आहे. या सगळ्या प्रयत्नामुळे लामिछानेचा ताबा मिळेल व बलात्कार प्रकरणात त्याची चौकशी करता येईल, अशी अपेक्षा नेपाळ पोलिसांना आहे.

मानसिक दृष्टया मी अस्थिर झालोय

काही दिवसांपूर्वी संदीप लामिछानेने सोशल मीडियावर पोस्ट करुन परत येणार असल्याचं म्हटलं होतं. आपण कुठे आहोत, त्याबद्दल त्याने कुठलाही खुलासा केला नव्हता. मानसिक आणि शारीरिक कारणांमुळे आयसोलेशनमध्ये असल्याचं त्याने म्हटलं होतं. अटक वॉरंटमुळे मानसिक दृष्टया मी अस्थिर झालोय, असं त्याच म्हणणं होतं.

केनियाला रवाना होण्याआधी संदीप लामिछाने मला काठमांडू येथील हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित तरुणीने केला होता.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.