CSK vs GT Final Rain | पावसामुळे नाचक्की, जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI कडे मैदान सुकवण्यासाठी यंत्रणा नाही, नेटकऱ्यांची टीका
Rain In Narendra Modi Stadium IPL 2023 Final | नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी सुकवण्यासाठी स्पंजचा वापर करण्यात आल्याने नेटकऱ्यांनी बीसीसीआय आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.

अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील अंतिम सामन्याचा निकाल हा आता थेट मंगळवारी 31 मे रोजी लागणार आहे. या महाअंतिम सामन्याचं आयोजन 28 मे रोजी करण्यात आलं होतं. तर 29 मे राखीव दिवस होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अखेर 29 मे या राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 29 मे रोजी सामन्याला सुदैवाने सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्स टीमने टॉस जिंकून गुजरात टायटन्स टीमला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने चेन्नईला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 215 धावांचं आव्हान दिलं.
सामन्यातील दुसऱ्या डावाला अर्थात चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली. सामन्यातील 3 बॉलनंतर पुन्हा पावसाची एन्ट्री झाली. जवळपास 29 मे रोजी रात्री 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास पाऊस आला. पाऊस आल्याने सामना थांबवण्यात आला. पावसाने काही वेळ बॅटिंग केल्यानंतर थांबला. मात्र खेळपट्टी ओली असल्याने सामना लवकर सुरु करता आला नाही.
पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टीवरील कव्हर हटवण्यात आले. पावसामुळे खेळपट्टीचा बट्टयाबोळ झाला. खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे खेळपट्टीवरील पाणी खेचून घेण्यासाठी ग्राउंड स्टाफने रंगाची जुनी बादली आणि स्पंजचा वापर केला. हाच मुद्दा धरुन नेटकऱ्यांनी बीसीसीआय आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांना ट्रोल केलं आहे.
बीसीसीआयची जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती आहे. तर ज्या मैदानात हा सामन्याचं आयोजन करण्यात आलंय, ते स्टोडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. त्यामुळे श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे जगातील मोठ्या स्टेडियममध्ये पाणी सुकवण्यासाठी यंत्रना नाही, असं म्हणत काहींनी खेद व्यक्त केलाय. तसेच श्रीमंत क्रिकेट मंडळाकडे यंत्रणा नसल्याने बीसीसीआयवर टीका केली आहे.
नेटकऱ्यांकडून टीका
World's richest cricket board cannot afford a Hover Cover ☕☕ pic.twitter.com/20KpypXYrl
— KESHAV GOAT (@KohliGOAT82) May 29, 2023
या पावसामुळे नेटकऱ्यांनी बीसीसीआयवर टीका तर केलीच आहे. सोबतच या निमित्ताने गलथान कारभारही चव्हाट्यावर आला आहे. क्रिकेट चाहत्यांनी या कारभारावरुन बीसीसीायवर ताशेरे ओढले आहेत. या निमित्ताने आपण व्हायरल झालेले काही मीम्स आणि पोस्ट पाहुयात.
पावसामुळे जय शाह नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
The personal hair dryer of Jay Shah wig is being used for drying the outfield. Richest board my foot.
CSK vs GT DhoniRain AhmedabadChinnaswamy stadium #IPL2023Final pic.twitter.com/E0GMMZFpQa
— Lawyaar™ (@DESIATTORNEY1) May 29, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.