IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर

उर्वरीत आयपीएल स्पर्धेला युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ आपआपली रणनीती आखण्यात व्यस्त असताना काही संघानी नव्या खेळाडूंना देखील संघात स्थान दिलं आहे.

IPL 2021 : आयपीएलच्या उर्वरीत पर्वामध्ये 9 खेळाडूंची अदला-बदली, वाचा सगळे बदल एका क्लिकवर
IPL 2021
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:35 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. काही संघ युएईला पोहोचले आहेत. तर काही संघाचे खेळाडू युएईमध्ये आहेत. भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने त्यातील खेळाडू अजून युएईला पोहोचलेले नाही. दरम्यान संघ व्यवस्थापन मात्र आपल्या कामाला लागला असून संघातील न खेळू शकणाऱ्या खेळाडूंना बदली खेळाडू घेण्याचं काम सध्या सुरु आहे. आतापर्यंत सर्व संघामध्ये मिळून 9 बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक बदल हे विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबी संघात करण्यात आले आहेत.

आयपीएलच्या उर्वरीत पर्वात आरसीबी संघात 4 बदल करण्यात आले आहेत. तर राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघामध्ये प्रत्येकी 2 बदल करण्यात आले असून कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. हे सर्व बदल परदेशी खेळाडूंमध्येच करण्यात आले आहेत.

आरसीबी संघात चार नवे बदल

आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा  याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला  घेण्यात आलं आहे.  हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.

जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi). आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे. टायने उर्वरीत आयपीएलमधून कोरोनाच्या कारणामुळे माघार घेतली आहे. राजस्थानचा मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्याने त्याच्या जागी ग्लेन फिलीप्सला संधी देण्यात आली आहे.

केकेआरमध्ये महत्त्वाचा बदल

कोलकाता नाईट रायडर्स संघातील सर्वात महाग खेळाडू पॅट कमिन्सला (Pat Cummins) खाजगी कारणांमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे पॅटच्या जागी जगातील एक उत्कृष्ट गोलंदाज केकेआरमध्ये सामिल होणार आहे. हा खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा टीम साऊदी.

इंग्लंडचा फिरकीपटू पंजाब किंग्समध्ये

पंजाबच्या संघाने इंग्लंडच्या आदिल रशीद (Adil Rashid) याला विकत घेतले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाए रिचर्डसन (Jhye Richardson) याच्याजागी रशीदला संधी दिली आहे. रिचर्डसनने उर्वरीत आयपीएलमधून माघार घेतल्याने पंजाबने हा निर्णय घेतला आहे. आदिलसह संघात ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू नाथन एलिस याला संधी देण्यात आली आहे. रिले मेरडिथच्या जागी नाथन खेळेल.

हे ही वाचा –

VIDEO : इंग्लंडच्या T20 Blast मध्ये दिसली धोनीची झलक, ‘या’ खेळाडूने उडवला ‘सेम टू सेम’ हेलिकॉप्टर शॉट

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(New Nine changes in IPL squad for IPL 2021 left matches including Wanindu Hasaranga and tim southee adil rashid)

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.