Icc World Cup 2023 | आयसीसीचा वनडे वर्ल्ड कप वेळापत्रकात मोठा बदल, इंडिया-पाकिस्तान सामन्याचं काय?
India vs Pakistan Match Reschedule 2023 | आयसीसीने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या वेळापत्रकात मोठा बदल केलाय. टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत मोठा निर्णय घेतलाय.
मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दोन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडिममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 10 शहरातील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार होता. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार होता. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सामन्याच्या तारखेत बदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्याबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीकडून वर्ल्ड कपचं नवं वेळापत्रक जाहीर
Nine fixtures have been rescheduled for #CWC23.
Details ?https://t.co/0SMibKlL1v
— ICC (@ICC) August 9, 2023
आयसीसीने इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह एकूण 9 सामन्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 15 ऑक्टोबरला होणारा सामना हा 14 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच टीम इंडिया आणि नेदरलँड (क्वालिफायर 1) यांच्यातील सामना हा बंगळुरुत 11 नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र आता हा सामना 12 नोव्हेंबरला होणार आहे. इंडिया विरुद्ध नेदरलँड यांच्यातील मॅच ही वर्ल्ड कप साखळी फेरीतील शेवटची मॅच असणार आहे.
एकूण 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल
New World Cup 2023 schedule: pic.twitter.com/sLjlhPZ8QZ
— Johns. (@CricCrazyJohns) August 9, 2023
वर्ल्ड कप 2023 बाबत महत्वाची माहिती
एकूण 10 संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने हा वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीम ही 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 या हिशोबाने एकूण 9 मॅच खेळणार आहे.
या 10 संघामधून पहिले 4 संघ हे सेमी फायनलमधील पोहचतील. सेमी फायनलचे 2 सामने हे मुंबईतील वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पहिली सेमी फायनल मॅच बुधवारी 15 नोव्हेंबर आणि दुसरी सेमी फायनल मॅच 16 नोव्हेंबरला पार पडेल. तर फायनल मॅच रविवारी 19 नोव्हेंबरला होईल.