New Zealand tour of India: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर, ट्रेंट बोल्टला विश्रांती
न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ भारत दौऱ्यावर येणार असला तरी ट्रेंट बोल्टला त्यात स्थान देण्यात आलेले नाही.
मुंबई : न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपला कसोटी संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ भारत दौऱ्यावर येणार असला तरी ट्रेंट बोल्टला त्यात स्थान देण्यात आलेले नाही. बोल्टशिवाय कॉलिन डी ग्रँडहोम देखील संघाचा भाग असणार नाही. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्या म्हणण्यानुसार या दोघांनाही या दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. किवी संघ 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांची मोहिम संपल्यानंतर भारताचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडचा भारत दौरा 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. (New Zealand Announce Squad For India Tour: Trent Boult Unavailable For Tests)
न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर 3 टी-20 सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.
भारत दौऱ्यासाठी किवी संघात 5 फिरकीपटू
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या कसोटी संघात 5 फिरकी गोलंदाज ठेवले आहेत. किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीचा खेळ पाहणे रंजक ठरेल. तो म्हणाला की बोल्ट आणि ग्रँडहोमला विश्रांती देण्यामागे संघाचे रोटेशन धोरण आणि बायोबबल हे कारण आहे.
“It’s exciting and what you want to face up against,” – coach Gary Stead discusses the five spin options named in the Test squad to face India later this month #INDvNZ pic.twitter.com/qhJRthpOzA
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 5, 2021
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठे आव्हान : विल्यमसन
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने भारत दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचे मोठे आव्हान असल्याचे सांगितले आणि या दौऱ्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगितले.
Following the naming of the Test Squad to face India later this month hear from skipper Kane Williamson about the challenge of taking on India at home. Full Squad | https://t.co/R4PIYBtjP3 #INDvNZ pic.twitter.com/MOsyS6Cvip
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 4, 2021
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यीय संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅगनर
इतर बातम्या
T20 World Cup 2021: इंग्लंडला सेमीफायनलमध्ये तर एन्ट्री मिळाली, पण महत्त्वाचा गोलंदाज स्पर्धेबाहेर
(New Zealand Announce Squad For India Tour: Trent Boult Unavailable For Tests)