WTC 2021 मध्ये विजयानंतरही न्यूझीलंडला भारताविरुद्ध कसोटी सामन्याचा धसका, संघातील प्रमुख खेळाडू म्हणतो…
कसोटी प्रकारातील विश्व चषक मानला जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. यावेळी किवीजनी भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला.
मुंबई: न्यूझीलंडचा संघ टी 20 विश्वचषकानंतर नोव्हेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय कसोटी संघ न्यूझीलंड संघाकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC final) पराभूत झाला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच भारतीय संघ न्यूझीलंड संघाशी कसोटी सामने खेळणार आहे. दरम्यान WTC Final मध्ये उल्लेखणीय कामगिरी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे (Devon conway) याने भारताविरुद्ध सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाच्या भावना सांगितल्या आहेत. त्याने त्यांची रणनीतीही स्पष्ट केली आहे.
संपूर्ण कसोटी मालिकेत भारताला पराभूत करण्याचं लक्ष्य असणाऱ्या न्यूझीलंड संघासाठी इंग्लंडमध्ये भारताला पराभूत करण्यापेक्षा भारतीय भूमीत पराभूत करणं फार कठीण असणार असल्याचं कॉन्वे म्हणाला. त्याने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले,“भारताला त्यांच्या घरी पराभूत करणं एक मोठं लक्ष्य आहे. जे आम्ही नक्कीच पूर्ण करु इच्छितो. त्यामुळे हा विजयही आमच्यासाठी WTC Final च्या विजयाइतकाच मोठा असेल.”
फिरकी गोलंदाजी मोठं आव्हान
डेवन कॉन्वेने यावेळी फिरकी गोलंदाजीला सर्वात मोठं आव्हान असल्याचं सांगितलं. त्याच्या मते भारतीय भूमीत मैदानावंर चेंडू मोठ्या प्रमाणात फिरतो. त्यामुळे स्पिनरला खेळण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागते. त्यामुळे भारताचे फिरकीपटू आमच्यासाठी मोठं आव्हान असतील. तसचं संघाच्या फलंदाजीबद्दल कॉन्वे म्हणाला. सुरुवातीला मार्टिन गप्टिल, टिम सीफर्ट आणि कर्णधार केन विलियमसन फलंदाजीला आल्यास मी चौथ्या स्थानावर येऊ शकतो. ते माझ्यासह संघासाठीही चांगलं असेल.
असा असेल न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.
हे ही वाचा
RCB vs PBKS Live Score, IPL 2021 : नाणेफेक जिंकून बँगलोरचा फलंदाजी करण्याचा निर्णय
IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा
(New Zealand batsman devon conway said beating india in their home will be as big as beating them in wtc final)