IND vs NZ 1st T20 : फक्त Arshdeep singh ची लास्ट ओव्हर नाही, ‘या’ पाच चूका टीम इंडियाला महाग पडल्या

IND vs NZ 1st T20 : तीन T20 सामन्याच्या सीरीजमध्ये न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीज जिंकण्यासाठी न्यूझीलंडला आता फक्त आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. टीम इंडियाच्या पराभवाला या पाच चूका कारणीभूत ठरल्य.

IND vs NZ 1st T20 : फक्त Arshdeep singh ची लास्ट ओव्हर नाही, 'या' पाच चूका टीम इंडियाला महाग पडल्या
ind vs nz 1st t20Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 9:01 AM

IND vs NZ 1st T20 : वनडे सीरीजप्रमाणे टीम इंडियासाठी T20 सीरीजची सुरुवात विजयाने होऊ शकली नाही. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला 21 धावांनी हरवलं. न्यूझीलंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टीम इंडियाला 9 बाद 155 धावांवर रोखलं. तीन T20 सामन्याच्या सीरीजमध्ये न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीज जिंकण्यासाठी न्यूझीलंडला आता फक्त आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. टीम इंडियाच्या पराभवाला या पाच चूका कारणीभूत ठरल्य.

1 टीम इंडियाची वेगवान गोलंदाजी चालली नाही. सुरुवातीला कॅप्टन हार्दिक पंड्या महागडा ठरला. त्यानंतर उमरान मलिकनेही त्याच्या एका ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. अर्शदीपने सिंहने खूपच निराश केलं. त्याच्या लास्ट ओव्हरमध्ये 27 धावा लुटल्या.

2 लास्ट ओव्हरमध्ये अर्शदीप सिंहला डॅरिल मिचेलची फटकेबाजी रोखता आली नाही. त्याने अर्धशतक झळकावत न्यूझीलंडला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. लास्ट पाच ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 59 धावा लुटल्या.

3 भारतीय टीमसाठी 177 धावांच लक्ष्य फार अवघड नव्हतं. त्यांना चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. इशान किशन आणि शुभमन गिल ती सुरुवात देऊ शकले नाहीत. किशन 4 आणि शुभमन गिल 7 रन्सवर आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही.

4 टीम इंडियाकडून चांगली पार्ट्नरशिप होऊ शकली नाही. त्याची परिणीती पराभवात झाली. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. या दोघांव्यतिरिक्त दुसरी भागीदारी झाली नाही. हे दोघे बाद होताच टीम इंडिया पिछाडीवर पडली. भारताचा पराभव स्पष्ट दिसू लागला. वॉशिंग्टन सुंदरने आपलं बॅटिंग कौशल्य दाखवलं. पण त्याला कोणाकडूनही साथ मिळाली नाही.

5 मिचेल सँटनरने खूपच शानदार गोलंदाजी केली. त्यांनी भारतीय फलंदाजांना जखडून टाकलं. त्याने T20 मधील नंबर 1 बॅट्समन सूर्यकुमार यादवला मेडन ओव्हर टाकली. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने आपल्या कोट्यतील 4 ओव्हर्समध्ये 11 धावा देऊन 2 विकेट काढले.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.