548 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाबरोबर बोर्डाने संपवला करार, जाणून घ्या त्यामागचं कारण….
आता तो देशासाठी फारसं क्रिकेट खेळणार नाही. खेळला, तर स्वत:च्या अटी-शर्तींवर. असं, यासाठी कारण बोर्डाने त्याच्यासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणला आहे.
मुंबई: आता तो देशासाठी फारसं क्रिकेट खेळणार नाही. खेळला, तर स्वत:च्या अटी-शर्तींवर. असं, यासाठी कारण बोर्डाने त्याच्यासोबतचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट संपुष्टात आणला आहे. क्रिकेट बोर्डाने (Cricket Board) त्या खेळाडू सोबतचा आपला करार संपवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 548 विकेट घेणाऱ्या खेळाडूसोबत असा अचानक निर्णय घेतलेला नाही. यामागे एक मोठं कारण आहे. बोर्डाने खेळाडूच्या मताचा आदर करत, त्याच्याबरोबरचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. हा खेळाडू आहे, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट. 33 वर्षाच्या ट्रेंट बोल्टला (Trent Boult) न्यूझीलंड (Newzeland) क्रिकेट बोर्डाने आपल्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून मुक्त केलं आहे. न्यूझीलंडच्या या गोलंदाजाला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. बोर्डाने त्याच्या या मताचा आदर करत, त्याला करारातून मुक्त केलं. ट्रेंट बोल्ट देशांतर्गत लीग मध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
ट्रेंट बोल्टचा करार संपवण्याचा अर्थ
ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आतापर्यंत 548 विकेट घेतलेत. यात 317 विकेट कसोटी क्रिकेटमध्ये, 169 वनडे आणि 62 विकेट टी 20 मध्ये घेतलेत. पण आता न्यूझीलंड बरोबर त्यांचा करार संपला आहे. आता तो देशासाठी खेळताना कमीच दिसेल. जेव्हा ट्रेंट बोल्ट उपलब्ध असेल, तेव्हाच त्याचं टीम मध्ये सिलेक्शन होईल. बोल्ट सध्या न्यूझीलंडच्या संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मध्ये त्याने बऱ्याच काळानंतर पुनरागमन केलय.
View this post on Instagram
न्यूझीलंड बोर्डाकडून निर्णयाचा आदर
“आम्ही ट्रेंट बोल्टच्या निर्णयाचा सम्मान केला. तो त्याच्या खेळाबद्दल प्रामाणिक आहे. फुल कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव नसणं, निश्चितच त्याची उणीव आम्हाला जाणवेल. आम्ही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो” असं न्यूझीलंड क्रिकेटचे CEO डेविड व्हाइट म्हणाले.