NZ vs BNG : न्यूझीलंडवर मोठी नामुष्की, अवघ्या 60 धावांत संघ सर्वबाद, बांग्लादेशचा दमदार विजय
न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला सामना असणाऱ्या टी-20 सामन्यात बांग्लादेशने न्यूझीलंड संघाच्या फलंदाजाना अगदी सळो की पळो केलं आहे.
ढाका : न्यूझीलंडचा संघ सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये पहिला टी-20 सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात बांग्लादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) उत्कृष्ट अशा टी-20 खेळाचे प्रदर्शन करत न्यूझीलंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी बांग्लादेशने न्यूझीलंडच्या फलंदाजाना अवघ्या 60 धावांवर ऑलआऊट केलं. बांग्लादेश संघाने नुकतेच ऑस्ट्रेलिया संघाला टी-20 सामन्यांत पराभूत केल्यानंतर आता न्यूझीलंडलाही धोबीपछाड केलं आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा संघ पूर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रेहमानने सर्वोत्कष्ट गोलंदाजी करत 3 विकेट मिळवले. तर शाकिब अल हसन, नासूम अहमद, सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले. ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ अवघ्या 60 धावांवर सर्वबाद झाला.लॅथम (18) आणि निकोल्स (18) या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. 2014 मध्येही श्रीलंका संघाविरुद्ध न्यूझीलंडचा संघ 60 धावांवरच सर्वबाद झाला होता. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा महिला संघही टी-20 फॉर्मेटमध्ये 60 धावांवर सर्वबाद झाला आहे.
बांग्लादेशचा संघ तीन विकेट्सनी विजय
न्यूझीलंडचा संघ बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खराब झाली. एका धावेवर पहिला विकेट गेल्यानंतर सात धावा झाल्या असताना पुन्हा बांग्लादेशचा आणखी एक विकेट गेला. त्यानंतर मात्र दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने डाव सावरत 25 धावांची महत्त्वाची खेळी केली. ज्याच्या जोरावर मुस्तफिकूर रेहमानने डाव शेवटपर्यंत नेत संघाला दमदार विजय मिळवून दिला.
हे ही वाचा :
IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण
IND vs ENG: चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात मोठा बदल, ‘या’ खेळाडूला नेमलं उपकर्णधार
(New zealand Cricket team all out on 60 runs against bangladesh in 1st t20 and won match with 7 wickets)