T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती

क्रिकेट जगत आतुरतेने वाट पाहत असलेला टी-20 विश्वचषक यंदा 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेला अजून बराच वेळ असतानाही न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे.

T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, 'या' दिग्गज खेळाडूला विश्रांती
टी20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 11:34 AM

मुंबई : आगामी आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. केन विलियमसन (Kane Williamson) च्या नेतृत्त्वाखाली 16 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. मात्र न्यूझीलंड संघाने दोन महिन्यांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे संघातील सर्वात दिग्गज खेळाडू रॉस टेलरला यंदा विश्रांती देण्यात आली असून त्याचा समावेश केला गेलेला नाही. तसेच कोलिन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम सारखी तगडी नावही दिसून येत नाहीत.

संघाने मिचेल सँटनर, ईश सोढ़ी आणि टॉड एस्टल या तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिलं आहे. तर वेगवान गोलंदाजीची धुरा ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन आणि टिम साउदी यांच्यावर असेल. याशिवाय जिम्मी नीशम आणि मार्क चेपमॅन अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसतील. टिम सीफर्ट यष्टीरक्षक असेल. हाच संघ भारताच्या दौऱ्यावर देखील असेल ज्यावेळी तीन टी-20 सामन्यांसह दोन टेस्ट सामने खेळवले जातील. यासोबतच न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांग्लादेश दौऱ्यासाठीचा संघ देखील जाहीर केला आहे. हा संघ 23  ऑगस्ट रोजी बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना होईल.

टी 20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-

केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.

बांग्लादेश दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ

टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलन, हामिश बेनेट, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डग ब्रेसवेल, कोलिन डी ग्रँडहोम, जॅकब डफी, मॅट हेन्री (वनडे), स्कॉट कुगलइन, कोल मॅक्कॉन्ची, एजाज पटेल, हेन्री निकोल्स, रचिन रवींद्र बेन सियर्स, ब्लेयर टिकनर आणि विल यंग.

हे ही वाचा – 

T20 World Cup 2021 चे ग्रुप जाहीर, भारतासोबत गटात ‘हे’ संघ, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठी माहिती समोर

IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

(New zealand cricket team announces squad for T20 world cup 2021 ross taylor is out of team)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.