न्यूझीलंडच्या माजी दिग्गज खेळाडूला पॅरालीसीसचा अटॅक, ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस कॅर्न्स (Chris Cairns) याच्यावर काही दिवसांपूर्वीच हार्ट सर्जरी करण्यात आली होती. आता त्याला पुन्हा पॅरालीसीसचा अटॅक आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
सिडनी : न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटर ख्रिस कॅर्न्स (Chris Cains) याच्या अडचणी वाढतच असून काही दिवसांपूर्वी ह्रदयावरील उपचार घेऊन घरी परतलेल्या ख्रिसला आता लकवा म्हणजेच पॅरालीसीसचा अटॅक (Paralysis attack) आला आहे. सध्या ख्रिसला ऑस्ट्रेलियाच्या स्पायनल स्पेशलिस्ट रुग्णालयाता भरती करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ख्रिस हा ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून काही दिवसांपूर्वाच त्याला हृदयासंदर्भातील आरोग्य समस्यांमुळे कॅनबरा येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ख्रिसला हृदयासंदर्भातील समस्या असल्याने त्याच्यावर मागील काही बऱ्याच शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या होत्या. पण काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती ठिक झाली होती. तो घरातल्यांची बातचीत देखील करत होता. त्याला घरी देखील पाठवण्यात आले होते. पण आता अचानक त्याला स्पाइनमध्ये स्ट्रोक आल्याने लकवा मारला आहे.
ख्रिसची कारकीर्द
51 वर्षीय ख्रिस न्यूझीलंड क्रिकेटमधील एक आघाडीचा अष्टपैलू म्हणून ओळकला जात असे. त्याने न्यूझीलंडकडून 62 कसोटी, 215 एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. 1989 मध्ये डेब्यू केल्यानंतर तो 2006 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने स्काई स्पोर्टवर कॉमेंट्री देखील केली होती. निवृत्तीनंतर तो पत्नी मेल आणि मुलांसह ऑस्ट्रेलियातील कॅनबरा येथेच स्थायिक झाला होता. 2000 साली न्यूझीलंडने भारताला नमवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी क्रिसने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने आपल्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार 320 धावा करत 218 विकेट्स घेतले आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 4 हजार 950 धावांसह 201 विकेट्सच घेतले आहेत.
ठीक होण्यास वेळ लागणार
ख्रिस कॅर्न्सचे वकील एरॉन लॉयड यांनी शुक्रवारी मीडियाशी बातचीत करताना ख्रिसच सध्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती दिली. तसेत त्याच्यासाठी करत असलेल्या प्रार्थनांसाठी चाहत्यांचे धन्यवाद मानले. सोबतच ख्रिसला सध्यातरी पुन्हा ठिक होण्यास काही वेळ लागेल असंही लॉयडने सांगितलं.
हे ही वाचा –
न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडू मृत्यूच्या दाढेतून बाहेर, महिन्याभरानंतर प्रकृतीत सुधार
T20 World Cup 2021 साठी दोन महिन्यांपूर्वीच न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ दिग्गज खेळाडूला विश्रांती
(New zealand Cricketer chris cairns suffers paralysis in legs)