WTC Final नंतर क्रिकेटमधून निवृत्तीबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर आणखी एका खेळाडूने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. कधी निवृत्ती घेणार याबद्दलही माहिती दिली आहे.

WTC Final नंतर क्रिकेटमधून निवृत्तीबाबत 'या' दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा
ross taylor and r ashwin-
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 1:40 PM

मुंबई : भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. न्यूझीलंडने 8 विकेट्सने भारताला मात देत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. दोन्ही संघानी अप्रतिम खेळाचे दर्शन घडवले खरे पण केन विल्यमसनच्या कप्तानीखाली न्यूझीलंडनेच विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात दोन्ही संघात बरेच दिग्गज खेळाडू खेळत होते. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बी जे वॉटलिंगने तर सामन्यापूर्वीच हा त्याचा शेवटचा सामना असेल असं सांगून निवृत्तीबाबत माहिती दिली होती. भारताचे देखील चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, इशांत शर्मा सारख्या खेळाडूंसाठी देखील ही शेवटची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याची संधी असावी. कारण त्यांच वय, फिटनेस पाहता बऱ्याच वर्षांनी होणाऱ्या पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन स्पर्धेसाठी खेळू शकतील असे वाटत नाही. दरम्यान या सामन्यानंतर लगेचच एका दिग्गज खेळाडूने देखील त्याच्या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठं विधान केलं आहे. (New Zealand Cricketer Ross Taylor Tells About his International Cricket Retirement After India vs New Zeland WTC Final 2021)

हा खेळाडू आहे न्यूझीलंड संघाचा (New Zealand Cricket Team) सर्वांत अनुभवी फलंदाज रॉस टेलर (Ross Taylor). बीजे वॉटलिंगने निवृत्तीचा निर्णय दिल्यानंतर रॉसही निवृत्ती लगेचच जाहिर करेल अशी चर्चा होती. मात्र रॉसने सामन्यानंतर निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी घरी जाऊन परिवाराशी भेटनार असल्याचं सांगितलं. न्‍यूजटॉक ZB या वृत्तसंस्थेशी बोलताना रॉसने याबाबतची माहिती दिली,

भावनांच्या भरात निर्णय घेणार नाही

रॉस टेलर आपल्या निवृत्तीबाबत म्हणाला  की, ”मी सध्यातरी घरी जाऊन फॅमिला भेटण्यासाठी उत्सुक आहे. मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरच्या सत्रात असतो तरी भावनांच्या भरात मला कोणताही निर्णय घ्यायचा नाही. मला आशा आहेकी मी अजून काही काळ न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळू शकतो.” रॉस टेलर न्‍यूझीलंड संघासाठी टेस्‍ट आणि वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. रॉस टेलरने 2023 च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा देखील वर्तविली आहे. टेलरने नुकताच 18 हजार धावांचा टप्पा पार केला. असे करणारा तो पहिला न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे. 108 टेस्‍टमध्ये 7 हजार 564 आणि 233 वनडेमध्ये 8 हजार 581 रन बनवले आहेत.

हे ही वाचा :

WTC Final : भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटसह विल्यमसनही भावूक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

WTC Final 2021 : न्यूझीलंडचा जिगरबाज खेळाडू, कारकीर्दीतील शेवटची कसोटी, बोट तुटलं तरीही खेळतच राहिला…!

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर निराश विराटची मोठी वक्तव्य, कसोटी संघात होणार बदल, काय म्हणाला कोहली?

(New Zealand Cricketer Ross Taylor Tells About his International Cricket Retirement After India vs New Zeland WTC Final 2021)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.