ICC WTC Final : फायनलला दोन दिवस उरले, न्यूझीलंडचा संघ पार्टीत मश्गुल, पार्टीचा Video

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तयार झाले आहेत. दोन्ही संघ सध्या इंग्लंडमध्ये आहेत. न्यूझीलंड संघाचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

ICC WTC Final : फायनलला दोन दिवस उरले, न्यूझीलंडचा संघ पार्टीत मश्गुल, पार्टीचा Video
न्यूझीलंड संघ
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 6:08 PM

साऊदम्प्टन : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final) दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. 18 जूनपासून भारत (India) आणि न्यूझीलंड (NewZeland) यांच्यात इंग्लंडच्या साऊदम्प्टन मैदानात सामन्याला सुरुवात होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता नाणेफेक होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे कसोटी क्रिकेटचा विश्वचषकच असल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष सामन्याकडे लागले आहे. त्यामळे दोन्ही संघाच्या खेळाडूंवरही तणाव असून याच तणावातून मुक्त होण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पार्टी करत आहे. (New Zealand Team Doing Party Before Playing ICC WTC Final vs India in Southampton ground)

न्यूझीलंडच्या संघाने नुकतेच इंग्लंडला सराव कसोटी मालिकेच 1-0 ने पराभूत केले. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागातील अप्रतिम प्रदर्शनामुळे न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभूत केले. पहिला सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने 8 विकेट्सने जिंकला. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असल्याने ते पार्टीच्या मूडमध्ये दिसत आहेत.

नील वॅगनर बनला वाढपी

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो सर्व न्यूझीलंडचे खेळाडू मजा करताना दिसत आहेत. कोरोना नियमांच पालन करुन सर्व खेळाडू पार्टी करत आहेत. नाच गाण्यासह सुरु असलेल्या पार्टीत सर्वच खेळाडू जोमात दिसत आहेत. पार्टीत मासांहारी खाण्यासह शाकाहारी जेवणही असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर स्वत: आपल्या सहखेळाडूंना प्रेमाने जेवन वाढताना दिसत आहे.

पार्टीच कारण काय?

WTC Final या महत्त्वाच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने 15 खेळाडूंना निवडले आहे. तर इंग्लंडच्या दौऱ्यासाठी 20 खेळाडू पोहोचले होते. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघात नसणारे 5 खेळाडू मायदेशी परतणार असल्याने त्याला फेअर-वेल म्हणून ही पार्टी आयोजित केली गेली आहे.

हे ही वाचा :

WTC Final: विराटसह करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर होऊ शकतो, कारण…

WTC Final : विजयी संघ होणार मालामाल, ICC च्या मानाच्या गदेसह मिळणार कोट्यावधी रुपये

WTC Final : जाणून घ्या कशी असेल अंतिम सामन्याची खेळपट्टी, भारतीय गोलंदाजाना फायदा होणार की तोटा?

(New Zealand Team Doing Party Before Playing ICC WTC Final vs India in Southampton ground)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.