NZ vs ENG Test : W वॅगनर, विलियमसनचा त्यानंतर Win, फक्त 9.2 ओव्हरमध्ये इंग्लंडची टीम कशी जिंकता, जिंकता हरली

NZ vs ENG Test : इंग्लंडला वाटलं नव्हतं, अशा पद्धतीने डाव त्यांच्यावर उलटेल, शाब्बास न्यूझीलंड. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं हे पुन्हा एकदा या टेस्ट मॅचच्या निमित्ताने दिसून आलं.

NZ vs ENG Test : W वॅगनर, विलियमसनचा त्यानंतर Win, फक्त 9.2 ओव्हरमध्ये इंग्लंडची टीम कशी जिंकता, जिंकता हरली
nz vs eng test Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 1:03 PM

NZ vs ENG TEST : न्य़ूझीलंडच्या टीमने इतिहास रचला आहे. फॉलोऑन घेऊन खेळणाऱ्या किवी टीमने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडवर 1 रन्सने विजय मिळवला. टेस्ट क्रिकेटच्या 146 वर्षाच्या इतिहासात चौथ्यांदा असं झालय. न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयात 3 W ची चर्चा आहे. एक W म्हणजे WIN आणि दुसरा W केन विलियमसन आणि नील वॅगनरचा आहे. ज्यांच्यामुळे अशक्यप्राय वाटणारा विजय मिळाला. न्यूझीलंडने दुसरी टेस्ट मॅच जिंकून 2 मॅचच्या सीरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

इंग्लंडने पहिल्या डावात 8 विकेटवर 435 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 209 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. पण हा डाव उलटा पडला. न्यूझीलंडने फॉलोऑनमध्ये खेळताना दुसऱ्या डावात 483 धावा केल्या. त्यांनी इंग्लंडचा 226 धावांचा लीड फेडला व विजयासाठी इंग्लंड टीमसमोर 258 धावांच टार्गेट ठेवलं. यात 132 धावांची इनिंग खेळणारा केन विलियमसनची भूमिका महत्त्वाची होती.

हा चमत्कार घडवला W वॅगनरने

इंग्लंडला जे लक्ष्य मिळालं, ते सोपं वाटत होतं. इंग्लिश फलंदाज फुल फॉर्ममध्ये होते. ते विजयाच्या जवळ पोहोचत होते. जो रुटला रोखणं कठीण वाटत होतं. बेन स्टोक्सने पण पाय रोवले होते. हे दोन्ही खेळाडू स्वबळावर टीमला विजय मिळवून देऊ शकतात. न्यूझीलंडच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर सामना हातातून निसटणार त्याची निराशा दिसत होती. पण त्याचवेळी चमत्कार झाला. हा चमत्कार वॅगनरने घडवला.

2 ओव्हर 2 मोठ्या विकेट

इंग्लंडची टीम विजयापासून 58 धावा दूर होती. वॅगनर 57 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. स्टोक्स आणि रुटमध्ये 120 धावांची भागीदारी झाली. त्याचवेळी वॅगनरने आपली कमाल दाखवली. 57 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्टोक्सला 33 धावांवर रोखलं. 201 रन्सवर इंग्लंडची 6 वी विकेट गेली. आपल्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्याने रुटला सुद्धा 95 रन्सवर आऊट केलं. अशी जिंकली मॅच

202 रन्सवर इंग्लंडची 7 वी विकेट गेल्यानंतर न्यूझीलंड टीममध्ये उत्साह संचारला. त्यांना विजयाची शक्यता दिसत होती. 71.4 ओव्हरमध्ये वॅगनरने टिम साऊदीच्या चेंडूवर बेन फोक्सचा डाइव्ह मारुन शानदार झेल पकडला. त्यानंतर जेम्स अँडरसनच्या रुपात इंग्लंडची अखेरची विकेट काढून ऐतिहासिक विजयाची स्क्रिप्ट लिहीली. अखेरच्या 9.2 ओव्हर्समध्ये मॅचच पलटली. वॅगनरने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एकूण 5 विकेट घेतले. यात 4 विकेट त्याने दुसऱ्याडावात घेतले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.