PAK vs NZ T20 Semi Final: पाकिस्तान वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर मोठा विजय

PAK vs NZ T20 Semi Final: नशिबाने मिळालेल्या संधीच पाकिस्तानने सोनं केलं.

PAK vs NZ T20 Semi Final: पाकिस्तान वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर मोठा विजय
pak beat newzelandImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 5:06 PM

सिडनी: पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. आज न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपची सेमीफायनल झाली. पाकिस्तानने या मॅचमध्ये न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडची टीम ग्रुप 1 मध्ये टॉपवर होती. या टीमने फक्त एक मॅच गमावली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात न्यूझीलंडच पारड जड समजल जात होतं.

महत्त्वाच्या सामन्यात खेळ उंचावला

पण प्रत्यक्षात असं काही घडलं नाही. पाकिस्तानने न्यूझीलंडवर 7 विकेट राखून विजय मिळवला. विजयासाठी दिलेलं 153 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. मोहम्मद रिजवान आणि कॅप्टन बाबर आजम यांची जोडी टी 20 वर्ल्ड कपमध्ये सातत्याने अपयशी ठरली होती. पण आज मात्र त्यांनी महत्त्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावला. पाकिस्तानची टीम तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 1992 पासूनच शानदार रेकॉर्ड ठेवणाऱ्या पाकिस्तानने यावेळी सुद्धा इतिहास बदलू दिला नाही.

रिजवान-बाबरची जबरदस्त पार्टनरशिप

153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आणि रिजवानने 105 धावांची खणखणीत सलामी दिली. बाबर आजम बाद होणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला. त्याने 42 चेंडूत 53 धावा केल्या. यात 7 चौकार होते. मोहम्मद रिजवानने 43 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात 5 चौकार होते. मोहम्मद हॅरिस 30 रन्सवर आऊट झाला. शान मसूद आणि इफ्तिखार अहमदच्या जोडीने विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पाकिस्तानच्या विजयाच श्रेय गोलंदाजांना

पाकिस्तानच्या विजयाच श्रेय गोलंदाजांना जातं. त्यांनी आज न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. फिन एलन आणि डेवॉन कॉनवे हे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज लवकर बाद झाले. कॉनवे 21 धावांवर रनआऊट झाला. फिनने 4 धावा केल्या. कॅप्टन विलियम्सन 46 आणि डॅरेल मिचेलच्या हाफ सेंच्युरीच्या बळावर न्यूझीलंडने 4 बाद 152 धावा केल्या.

'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.