IPL 2022: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय, CSK सह सात IPL टीम्सना मिळाली मोठी खुशखबरी

IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीग स्पर्धा (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. ही लीग सुरु होण्याआधी सात फ्रेंचायजींना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

IPL 2022: न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय, CSK सह सात IPL टीम्सना मिळाली मोठी खुशखबरी
आयपीएल लिलाव
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:30 PM

मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रिमियर लीग स्पर्धा (IPL 2022) येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. ही लीग सुरु होण्याआधी सात फ्रेंचायजींना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. न्यूझीलंडचे सर्व प्रमुख खेळाडू नेदरलँड विरुद्ध होणाऱ्या T-20 आणि वनडे मालिकेत (Netherlands tour of New Zealand, 2022) खेळणार नाहीयत. न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड यांनी ही माहिती दिली. न्यूझीलंडची नेदरलँड विरुद्ध ही सीरीज मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू या सीरीजमध्ये खेळत नाहीयत, ही आयपीएलच्या संघ मालकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. नेदरलँडचा संघ मार्च अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू खेळत नाहीयत, याचाच अर्थ न्यूझीलंडची बी टीम (Netherlands vs New Zealand) मैदानावर उतरेल.

SRH ला सर्वात मोठा दिलासा

न्यूझीलंडचे सर्व प्रमुख खेळाडू आयपीएल 2022 मध्ये खेळत आहेत, अशी माहिती गॅरी स्टीड यांनी दिली. न्यूझीलंड़ बोर्डाच्या या निर्णयामुळे आयपीएलमधील 10 पैकी सात फ्रेंचायजींना मोठा दिलासा मिळाला आहे. आयपीएलमधल्या फक्त तीन संघानी न्यूझीलंडचा एकही खेळाडू विकत घेतलेला नाही.

राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडच्या सर्वाधिक तीन खेळाडूंना विकत घेतलं आहे. ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम आणि डॅरेल मिचेल हे प्रमुख खेळाडू आहेत. न्यूझीलंडचा केन विलियमनस सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन आहे. त्यामुळे हैदराबादने सुटकेचा निश्वास सोडला असेल. ग्लेन फिलिप्सही हैदराबाद संघाचा भाग आहे.

चेन्नईला सर्वात मोठा दिलासा

चेन्नई सुपर किंग्सने न्यूझीलंडच्या तीन क्रिकेटपटूंना विकत घेतलं आहे. डेवॉन कॉनवे, एडम मिल्न आणि मिचेल सँटनर असे हे तीन खेळाडू आहेत. गुजरात टायटन्सने लोकी फर्ग्युसनला 10 कोटीच्या मोठ्या किमतीला विकत घेतलं आहे. टिम सायफर्ट दिल्ली कॅपिटल्सकडून तर टिम साऊदी केकेआरकडून खेळतोय. आरसीबीने फिन एलेनला आपल्या संघात घेतलं आहे. फक्त पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तीन संघात एकही न्यूझीलंडचा क्रिकेटपटू नाहीय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.