दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाबाद गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य, पंत-अय्यर नव्हे दुसऱ्याच खेळाडूवर विश्वास
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सलग तिसऱ्यांदा आयपीएल प्लेऑफ फेरी गाठली पण तीनही वेळा जेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले. श्रेयस अय्यरने 2019 आणि 2020 मध्ये या संघाचे कर्णधारपद भूषवले, तर यंदाच्या मोसमात ऋषभ पंतला कर्णधार करण्यात आले.
मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सलग तिसऱ्यांदा आयपीएल प्लेऑफ फेरी गाठली पण तीनही वेळा जेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले. श्रेयस अय्यरने 2019 आणि 2020 मध्ये या संघाचे कर्णधारपद भूषवले, तर यंदाच्या मोसमात ऋषभ पंतला कर्णधार करण्यात आले, कारण अय्यर हंगामापूर्वी जखमी झाला होता. चालू हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पंतला कर्णधारपद मिळाले. अय्यर दुसऱ्या टप्प्यात परतला पण तरीही पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले. या मोसमात पंतने ज्या प्रकारे संघाचे कर्णधारपद भूषवले आहे ते सर्वांना प्रभावित करते. त्याची कामगिरी पाहून असे म्हणता येईल की, पंत पुढील हंगामातही दिल्लीचा कर्णधार असेल, पण भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला दुसऱ्याच खेळाडूवर विश्वास आहे. पुढील मोसमात संघाचे नेतृत्व करण्यासाठी गंभीरने वेगळ्या खेळाडूचे नाव सुचवले आहे. (No Rishabh Pant, Shreyas Iyer; Gautam Gambhir Picks Ravichandran Ashwin as Delhi Capitals Captain For IPL 2022)
गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल जेतेपद मिळवून देणारा कर्णधार आहे. त्यानंतर तो 2018 मध्ये पुन्हा दिल्लीच्या संघात परतला. या मोसमात त्याने अर्ध्यातच संघाचे कर्णधारपद सोडले आणि श्रेयस अय्यर कर्णधार झाला. गंभीरला वाटते की, पुढील मोसमात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने संघाचे नेतृत्व करावे. आयपीएलचा मोठा लिलाव पुढील हंगामापूर्वी होणार आहे. अशा स्थितीत दिल्लीचे कोणते खेळाडू त्यांच्यासोबत कायम राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अश्विनला रिटेन केल्यास कर्णधारपद द्यावं
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या शोमध्ये गंभीरला विचारण्यात आले की, दिल्लीने पुढील हंगामात अश्विनला कायम ठेवावे का? याचे उत्तर देताना गंभीरने हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे दिली. तो म्हणाला, “मी त्याच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे. तो जगातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे. जर तुम्ही संपूर्ण लाईनअप पाहिली तर हा एक विचित्र निर्णय असू शकतो, पण जर मी तिथे असतो, तर मी त्याला पुढच्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवले असते.
‘अश्विनसारख्या खेळाडूला मी कधीही माझ्या संघात घेणार नाही’
स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आयपीएल 2021 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा खलनायक ठरला. अश्विनच्या मोठ्या चुकीमुळे दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीची संधी गमावली. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विन असे करण्यात अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विनकडे चेंडू होता.
या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर अश्विन हॅटट्रिकवर होता, पण राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून दिल्लीचे स्वप्न भंग केले. भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे की, तो रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूला आपल्या टी – 20 संघात कधीही ठेवणार नाही आणि त्याच्या जागी वरुण चक्रवर्ती किंवा सुनील नारायणच्या रूपात विकेट घेणाऱ्या फिरकीपटूंना संधी देईल. आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी करणाऱ्या आर. अश्विनने सामना हातचा गमावला.
अश्विन अपयशी
संजय मांजरेकर म्हणाले, ‘आपण अश्विनबद्दल बरंच बोललो. अश्विन टी -20 सामन्यांमध्ये कोणत्याही संघासाठी तितका प्रभावी राहिलेला नाही. जर तुम्ही अश्विनला बदलू इच्छित असाल तर असे काही होईल असे मला वाटत नाही, कारण तो गेल्या 5-7 वर्षांपासून असाच आहे. मला माहिती आहे की कसोटी सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म कौतुकास्पद आहे. मात्र त्याला इंग्लंडमध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही हे पाहून वाईट वाटले. संजय मांजरेकर म्हणाले, ‘रविचंद्रन अश्विन टी -20 क्रिकेटमध्ये तितक्या प्रभावीपणे विकेट घेत नाही आणि कोणतीही फ्रँचायझी त्याला फक्त धावा रोखण्यासाठी संघात ठेवू इच्छित नसणार.
इतर बातम्या
PHOTO: आगामी T20 World Cup साठी सर्व देश रंगणार नव्या रंगात, जर्सीचा लूक व्हायरल
(No Rishabh Pant, Shreyas Iyer; Gautam Gambhir Picks Ravichandran Ashwin as Delhi Capitals Captain For IPL 2022)