Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत.

Sourav Ganguly : खराब कामगिरी तरीही चिंता नाही, रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्य, सौरव गांगुली असं का म्हणाले, जाणून घ्या...
रोहित आणि विराटच्या कामगिरीवर गांगुलींचं भाष्यImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 1:03 PM

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) बॅटने झगडत आहेत. अशा स्थितीत त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. कारण, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. रोहित आणि विराटच्या खराब फॉर्ममुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना विधान करण्यास भाग पाडले आहे. गांगुलीने मात्र रोहित आणि विराटच्या फॉर्मची काळजी नसल्याचे म्हटले आहे कारण T20 विश्वचषक अजून दूर आहे. पण, गांगुली यांनी असं म्हटलं असलं तरी रोहित आणि विराटच्या सुमार कामगिरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. चाहत्यांना देखील त्यांनी नाराजचं केल्याचं ट्विटरवरुन दिसून येतं.

सौरव गांगुली काय म्हणाले?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मिड-डेशी बोलताना सांगितले की, ‘विराट-रोहितच्या फॉर्मची मला अजिबात चिंता नाही. तो खूप चांगला आणि मोठा खेळाडू आहे. T20 विश्वचषक अजून खूप दूर आहे आणि मला विश्वास आहे की हे दोघेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतील. IPL 2022 संपल्यानंतर भारताला 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेत रोहित आणि विराटला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

IPL 2022 मध्ये विराटची कामगिरी

लीगच्या 15 व्या मोसमात विराटने 13 सामन्यात 20 पेक्षा कमी सरासरीने 236 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही 113 राहिला आहे. त्याला या मोसमात आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. पण तो तीन वेळा गोल्डन डकचाही बळी ठरला आहे. कोहलीची आयपीएलमधील 14 वर्षांतील सर्वात खराब कामगिरी. यापूर्वी, कोहलीने IPL च्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये कमी धावा केल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

IPL 2022 मध्ये रोहितची खराब कामगिरी

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची अवस्था विराटपेक्षाही वाईट आहे. 15 व्या मोसमात त्याने 12 सामन्यात 18 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 218 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून त्याला या मोसमात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यांच्या खराब कामगिरीमुळे मुंबई प्रथमच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. दरम्यान, भारताला ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक 2022 खेळायचा आहे. रोहितची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. तर विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.