Virat kohli Fight IPL 2023 : गौतम गंभीर, नवीन-उल-हकशिवाय विराट LSG च्या आणखी एका खेळाडूला भिडला, VIDEO

Virat kohli Fight IPL 2023 : अंपायरनी मध्यस्थी करेपर्यंत दोघांची मैदानात वादावादी सुरु होती. विराट कोहलीला काल काय झालेलं? आयपीएलचा 43 वा सामना हार-जीतपेक्षा भांडणामुळे जास्त लक्षात राहिला.

Virat kohli Fight IPL 2023 : गौतम गंभीर, नवीन-उल-हकशिवाय विराट LSG च्या आणखी एका खेळाडूला भिडला, VIDEO
IPL 2023 Virat kohliImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:18 AM

लखनौ : इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल 43 वा सामना खेळला गेला. हा सामना कोण जिंकलं?, कोण हरलं? यापेक्षा वादावादीमुळे जास्त गाजला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा गौतम गंभीर यांच्यात मॅच संपल्यानंतर जोरदार वाजलं. त्याशिवाय या मॅचमध्ये आणखी काही वादाचे प्रसंग घडले. फक्त विराट कोहली या सगळ्या वादांच्या केंद्रस्थानी होता. मॅच संपल्यानंतर खेळाडू परस्परांशी हस्तांदोलन करत होते, त्यावेळी नवीन-उल-हक बरोबर विराटची शाब्दीक बाचाबाची झाली.

त्याशिवाय मॅच सुरु असताना, रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या आणखी एका खेळाडूबरोबर विराट कोहलीच वाजलं. कालचा सामना RCB ने जिंकला. आरसीबीने पहिली बॅटिंग करताना, निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 126/9 धावा केल्या.

आधी काय झालेलं?

प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा डाव 108 धावात आटोपला. RCB ने 18 धावांनी विजय मिळवला. याआधी दोन्ही टीम्समध्ये झालेल्या सामन्यात लखनौने विजय मिळवला होता. त्यावेळी लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरच्या एका कृतीवरुन वाद झाला होता.

गंभीर, नवीन उल हक शिवाय विराट अजून कोणाबरोबर भांडला?

कालच्या सामन्यात लखनौसमोर छोटं लक्ष्य होतं. पण आरसीबीच्या बॉलर्सनी भन्नाट बॉलिंग केली. पावरप्लेच्या अखेरीस 5 बाद 38 अशी लखनौची स्थिती होती. सामना जसा पुढे सरकत गेला, तशा गोष्टी बदलत गेल्या. आपल्याच टीमच्या वानिंदु हसरंगावर सुद्धा विराट कोहली चिडला होता. 16 व्या ओव्हरच्या अखेरीस विराटची क्रीजवर असलेल्या अमित मिश्रा सुद्धा सोबत वादावादी झाली. विराट कोहली अमित मिश्रावर ओरडताना दिसला. मैदानावरील पंचांनी मध्यस्थी करेपर्यंत दोघे थांबले नाहीत. आयपीएल मॅनेजमेंटची कारवाई

दरम्यान कालच्या सामन्यात झालेल्या वादावादी प्रकरणात विराट कोहली, गौतम गंभीर, नवीन उल हक यांच्यावर आयपीएल मॅनेजमेंटने कारवाई केली आहे. विराट आणि गंभीरची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. त्याचवेळी नवीन उल हकची 50 टक्के मॅच फी कापण्यात आली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.