T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

येत्या 17 ऑक्टोबर 14 नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारताने काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केला. निवडलेल्या संघात गोलंदाजाचा विचार करता तीन मुख्य वेगवान गोलंदाज तर पाच फिरकीपटू आहेत.

T20 World cup संघात 'या' खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 10:50 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 8 सप्टेंबर रोजी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. यावेळी 15 मुख्य खेळाडूंसह 3 राखीव खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. यामध्ये घेण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या संघात असण्यावर जितकी चर्चा आहे तितकीच काही खेळाडूंना संधी न देण्यात आल्याने देखील आहे. त्यातच आयपीएलचं उर्वरीत पर्व सुरु झाल्यानंतर त्यात भारतीय खेळाडू करत असलेल्या कामगिरीनंतर या सर्वच चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

दरम्यान आय़पीएलच्या दुसऱ्या पर्वात आरसीबीचा मुख्यं गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra chahal) करत असलेल्यटा दमदार कामगिरीनंतर त्याला टी20 संघात न घेतल्याने मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच चहलही प्रत्येक सामन्यानंतर आपल्या कामगिरीने निवड समितीला सडेतोड उत्तर देत आहे. चहलने आतापर्यंत झालेल्या आरसीबीच्या सामन्यात प्रत्येकवेळी अप्रतिम कामगिरी केली आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यातही (RCB vs RR) त्याने 4  षटकात फक्त 18 रन देत 2 विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे युएईमध्ये खेळलेल्या 24 आय़पीएल सामन्यात 4 वेळा चहलने सामनावीराचा पुरस्कार मिळवला आहे. त्यामुळे युएईच्या मैदानात चहलची गोलंदाजी बहरत असतानाही त्याठिकाणी होणाऱ्या विश्वचषकात चहलला जागा न दिल्याने चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

सेहवागनेही उठवला होता प्रश्न

टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अनुभवी चहलच्या जागी नवख्या राहुल चहरला (Rahul Chahar) संधी देण्यात आली आहे. या निर्णयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला होता,”चहलला विश्वचषकाच्या संघामध्ये का नाही घेतलं, याबाबत समितीने उत्तर द्यायला हवं. तसच राहुल चाहरने श्रीलंका दौैऱ्यात खूप भारी गोलंदाजी केली नव्हती. ज्यामुळे त्याला थेट संघात स्थान मिळालं. चहलचे याआधीचे रेकॉर्ड पाहता त्याला संघात असायला हवं होतं.”

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने  दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा

T20 World cup मध्येही चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे भारत पराभूत होणार, माजी पाकिस्तानी खेळाडूचा दावा

IPL 2021: दिल्लीच्या आवेश खानचं दमदार प्रदर्शन, यॉर्कर टाकण्यात तरबेज, ‘बॉटल आणि शूज’ आहेत यामागील कारण

IPL 2021: हर्षल ठरतोय यंदाच्या हंगामातील सर्वात घातक गोलंदाज, आता सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर नजर

(Not taking yuzvendra chahal in T20 world cup sqaud is may be a big mistake by bcci after his performance in IPL 2021)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.