IND vs ENG : सूर्यकुमार यादवला सेमीफायनलआधी मिळाली वाईट बातमी, आता काहीही करुन तो मान मिळवावाच लागेल
IND vs ENG : T20 World Cup 2024 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. गुयानामध्ये हा सामना होणार आहे. ही नॉक आऊट मॅच आहे. म्हणजे हरलं तर बाहेर. या मॅचआधी मधल्या फळीतील टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवला वाईट बातमी मिळाली आहे.
T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनल मॅचला आता काही तास उरलेत. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना मजबूत इंग्लंडच्या टीम विरुद्ध आहे. या मॅच आधी टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादवला एक वाईट बातमी मिळाली आहे. सूर्यकुमार यादव आता T20 क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 फलंदाज राहिलेला नाही. सूर्यकुमार यादवची जाग ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने घेतली आहे. बुधवारी जारी झालेल्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज टॉपवर पोहोचलाय. भारतीय फलंदाजाच एका स्थानाच नुकसान झालय.
ICC T20 फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ट्रेविस हेड 844 रेटिंग पॉइंटसह पहिल्या स्थानावर पोहोचलाय. त्याने क्रमवारीत 4 पोजिशन्सची झेप घेत पहिलं स्थान मिळवलय. ट्रेविस हेड भारताविरुद्ध 76 धावांची इनिंग खेळला. त्याने या टुर्नामेंटमध्ये 255 धावा केल्या. याचमुळे तो टी 20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलाय. सूर्यकुमार यादवने या टुर्नामेंटमध्ये दोन हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तो 31 धावा करु शकला. बांग्लादेश विरुद्ध फक्त 6 रन्स करु शकला. त्यामुळे सूर्याला त्याचं नंबर 1 च स्थान गमवाव लागलं.
सूर्याचा स्ट्राइक रेट 190 पेक्षा जास्त
सूर्यकुमार यादवकडे पुन्हा T20 रँकिंगमध्ये नंबर 1 फलंदाज बनण्याची संधी आहे. सूर्यकुमार यादव आज T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल मॅच खेळेल. टीम इंडिया जिंकली, तर फायनलच तिकीट मिळेल. दोन्ही मॅचमध्ये सूर्या मोठी इनिंग खेळला, तर तो पुन्हा टी 20 क्रिकेटमध्ये नंबर 1 फलंदाज बनू शकतो. इंग्लंड विरुद्ध त्याने नेहमीच धावा केल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध सूर्याने 45 पेक्षा जास्त सरासरीने 274 धावा केल्या आहेत. यात एक शतक आहे. सूर्याचा स्ट्राइक रेट 190 पेक्षा जास्त आह. ट्रेविस हेडचा नंबर 1 फलंदाज बनण्याचा आनंद फार काळ टिकणार नाही.