Virat Kohli-रोहित सोबत खेळलेल्या खेळाडूच करिअर धोक्यात, डॉक्टरांनी केलं चुकीच ऑपरेशन
सर्जरीनंतरही त्याची दुखापत कायम आहे. कोण आहे तो खेळाडू?, सिंगापूरमध्ये झालं होतं ऑपरेशन.
नवी दिल्ली: खेळाडूला मोठी दुखापत झाल्यानंतर त्याची सर्जरी होते. काही दिवसातच तो खेळाडू पुन्हा खेळण्यासाठी फिट होतो. बांग्लादेशचा विकेटकीपर-फलंदाज नुरुल हसनसोबत काही वेगळच घडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुरुल हसनला झिम्बाब्वे दौऱ्यावर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या बोटाची सर्जरी झाली. सर्जरीनंतर दुखापत बरी व्हायला पाहिजे होती. पण सर्जरीनंतर त्रास उलटा वाढला. “कदाचित सर्जरी योग्य झाली नाही. बोटामध्ये अजूनही दुखापत कायम आहे” असं नुरुल हसनने सांगितलं.
आता खुलासा केला
“मला माझ्या करिअरची चिंता वाटतेय. बोटाची सर्जरी झाल्यानंतरही दुखापत बरी झालेली नाही” असं नुरुल हसनने सांगितलं. सिंगापूरमध्ये हसनची सर्जरी झाली होती. डॉक्टर एंथनी फू ने रफेल्स हॉस्पिटलमध्ये बोटावर सर्जरी केली. त्यानंतर तो न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीज आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळला. “या दोन्ही टुर्नामेंटमध्ये मी खेळलो, पण माझ्या वेदना कमी झाल्या नव्हत्या. माझा त्रास कायम होता” असा नुरुल हसनने आता खुलासा केलाय. क्रिकबजने हे वृत्त दिलय.
इंजेक्शन घेऊन खेळला
सर्जरीनंतरही माझ्या बोटामध्ये वेदना कायम होत्या. “भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना मी इंजेक्शन घेऊन खेळलो. इंजेक्शन घेतल्यानंतर माझं बोट सुन्न झालं. तिथे काहीच हालचाल जाणवत नव्हती” असं नुरुल हसनने सांगितलं.
मला माझ्या सर्जरीवरच संशय येतोय
“आता मला माझ्या सर्जरीवरच संशय येतोय. वेदना कधी कमी होणार, याची मी वाट पाहतोय. आता असं वाटतय की, सर्जरी केली नसती, तर बरं झालं असतं” असं हसन म्हणाला. भारताविरुद्ध नुरुल हसन इंजेक्शन घेऊन खेळत होता, हे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या मेडीकल टीमने मान्य केल. भारताविरुद्ध किती धावा केल्या?
या दुखापतीमुळेच बांग्लादेशचा विकेटकीपर फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही. भारताविरुद्ध मीरपूर टेस्टमध्ये 6 आणि 31 धावा केल्या. चटोग्राम टेस्टमध्ये सुद्धा त्याने 16 आणि 3 रन्सच केल्या. टी 20 वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू एकही अर्धशतक झळकवू शकला नाही.