NZ vs ENG Test : न्यूझीलंडच्या Tom Latham ची कमाल, अशी कामगिरी करणारा 7 वा बॅट्समन

NZ vs ENG Test : पहिल्या डावात 226 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. न्यूझीलंडचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याचा त्यामागे इरादा होता.

NZ vs ENG Test : न्यूझीलंडच्या Tom Latham ची कमाल, अशी कामगिरी करणारा 7 वा बॅट्समन
tom lathamImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:26 AM

NZ vs ENG Test : वेलिंग्टनमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने खराब प्रदर्शन केलं. पण दुसऱ्याडावात त्यांनी धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या डावात 226 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला. न्यूझीलंडचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याचा त्यामागे इरादा होता. पण टॉम लॅथम आणि डेवन कॉनवे जोडी अशी जमली, की, त्यांनी शतकी भागीदारी केली. यावेळी विकेटकीपर बॅट्समन टॉम लॅथमने करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

इंग्लंड विरुद्ध वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात टॉम लॅथम आणि डेवन कॉनवे टीमला चांगली सुरुवात देऊ शकले नव्हते. कॉनवे खात न उघडताच आऊट झाला होता. लॅथमने 35 रन्स केल्या होत्या. पण दुसऱ्या इनिंगमध्ये दोघांनी पहिल्या डावात केलेल्या चुकांमधून धडा घेतला. त्यांनी अर्धशतकी खेळी केली.

काय टप्पा गाठला?

टॉम लॅथमने वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात अर्धशतकी खेळी केली. या दरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमधील 5000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा 7 वा फलंदाज ठरला. 72 व्या कसोटीच्या 127 व्या इनिंगमध्ये टॉम लॅथमने हा टप्पा गाठला. वेलिंग्टन कसोटीच्या दुसऱ्याडावात झळकवलेलं अर्धशतक टेस्ट करिअरमधील 26 व अर्धशतक ठरलं. टेस्टमध्ये न्यूझीलंडकडून कोणी किती धावा केल्या?

न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड रॉस टेलरच्या नावावर आहे. त्याने 112 कसोटी सामन्यात 196 इनिंगमध्ये 7863 धावा केल्या आहेत. या यादीत केन विलियमसन दुसऱ्या स्थानावर आहे. तो टेलरला मागे टाकण्याच्या जवळ आहे. विलियमसनने 92 कसोटी सामन्यात 7655 धावा केल्या आहेत. यानंतर स्टीफन फ्लेमिंगचा नंबर येतो. ( 7172 धावा), ब्रँडन मॅक्कुलम (6453 रन्स), मार्टिन क्रो (5444 धावा) आणि जॉन राइट (5334 धावा)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.