IND vs ENG Weather Report | आज मॅचच्यावेळी कसं असेल हवामान? पाऊस व्यत्यय आणेल का?
IND vs ENG Weather Report | टीम इंडियाचा आज इंग्लंड विरुद्ध सामना. हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे?. त्यावेळी पावसाची शक्यता किती आहे, त्या बद्दल जाणून घेऊया. टीम इंडियासाठी इंग्लंड विरुद्धचा हा सामना महत्त्वाचा का आहे?
गुवहाटी : पुढच्या आठवड्यापासून म्हणजे 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होत आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होतोय. भारत यजमान आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणाऱ्या टीम्सना भारतीय खेळपट्ट्यांची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मुख्य टुर्नामेंटआधी सराव सामने आयोजित करण्यात आले आहेत. कालपासून सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पाकिस्तानी टीमला न्यूझीलंडने नमवलं. दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. आज टीम इंडिया आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. समोर इंग्लंडच आव्हान आहे. भारतात सध्या पावसाळ्याचा सीझन सुरु असताना वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होत आहे. त्यामुळे वर्ल्ड कप सामन्यांमध्ये पाऊस बाधा आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. त्यावेळी पावसाची शक्यता किती आहे त्या बद्दल जाणून घेऊया.
पाऊस टीम इंडियाचा पाठलाग सोडणार नाही असं दिसतय. आज इंग्लंड विरुद्ध पहिल्या सराव सामन्यात पाऊस बाधा आणू शकतो. त्यामुळे सामन्याला विलंब लागण्याची शक्यता आहे. आज हैदराबादमध्येही सराव सामना होणार आहे. तिथेही पाऊस धारा बरसू शकतात. पुढच्या दोन दिवसांसाठी गुवाहाटीबद्दल हवामानाचा जो अंदाज आहे, तो सुद्धा फार चांगला नाहीय. विद्यमान चॅम्पियन इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाकडे उत्तम प्लेइंग इलेव्हन उतरवण्याची संधी आहे. शनिवारी गुवहाटीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या सामन्यातून दोन्ही टीम्सना त्यांची क्षमता आणि कमकुवतबाजू कळणार आहे. यानंतर टीम इंडिया नेदरलँड्स विरुद्ध पुढचा सराव सामना खेळेल आणि इंग्लंड बांग्लादेश विरुद्ध. हवामान विभागाच्या अंदाजानुसार संध्याकाळी 4 नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे. तापमान 35 अंश सेल्सियस राहील.
दोन्ही टीम्सचे स्क्वाड
भारत | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. इंग्लंड | जॉस बटलर (कॅप्टन-विकेटकीपर), जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस वोक्स, डेविड विली, गस एटकिंसन, मार्क वुड, आदिल रशीद आणि रीस टॉपली