World cup 2023 | सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला पहिली वॉर्निंग, ‘ही’ टीम बिघडवेल खेळ
World cup 2023 | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने अजून आपल अभियान सुरु केलेलं नाही. मात्र त्याआधीच टीम इंडियाला मोठी वॉर्निंग मिळालीय. निश्चित टीम इंडियाला आधीच या सर्व प्रश्नांची उत्तर शोधून ठेवावी लागतील.
अहमदाबाद : भारत भूमीवर वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटचा शुभारंभ झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळला गेला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना म्हणजे मागच्या वर्ल्ड कप फायनलचा रिपीट टेलिकास्ट होता. लॉर्ड्सच्या मैदानावर 2019 मध्ये वनडे वर्ल्ड कपची फायनल झाली होती. त्यावेळी इंग्लंड आणि न्यूझीलंडची टीम फायनलमध्ये भिडली होती. त्या सामन्यात इंग्लंडने बाऊंड्री काऊंटच्या आधारावर वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्य़ात फक्त इंग्लंडचीच वाईट अवस्था झाली नाही, तर टीम इंडियाच टेन्शन सुद्धा वाढलं आहे. या मॅचनंतर टीम इंडियाला रेड अलर्ट मिळालाय आणि हे काम न्यूझीलंडने केलय. आधी इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्याबद्दल समजून घ्या. या मॅचमध्ये टॉम लॅथम न्यूझीलंडचा कॅप्टन होता. त्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांच न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर फार काही चाललं नाही. 50 ओव्हर खेळल्यानंतर इंग्लंडच्या टीमने 9 विकेट गमावून 282 धावा केल्या.
न्यूझीलंडने फक्त एक विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. न्यूझीलंडने संपूर्ण सामन्यात इंग्लंडला डोक वर काढण्याचीच संधी दिली नाही, त्यांनी इंग्लिश टीमवर एकतर्फी विजय मिळवला. आय़सीसी टुर्नामेंटसमध्ये न्यूझीलंड टीमने नेहमीच भारताचा खेळ बिघडवलाय. आयसीसी इवेंट्समध्ये बहुतांश सामन्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध सरस खेळ केलाय. वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला शेवटच 2003 मध्ये हरवलं होतं. याच न्यूझीलंडने 2019 साली भारताच वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न मोडलं होतं. याच टीमने 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा या टीमने भारताला वारंवार अडचणीत आणलय. या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा अडथळा पार करणं हेच टीम इंडिया समोरच मुख्य आव्हान असेल. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने जबरदस्त खेळ दाखवला. न्यूझीलंड पुन्हा टीम इंडियाचा मार्ग तर रोखय़णार नाही ना? असा विचार भारतीय चाहत्यांच्या मनात येऊन गेला असेल.
तीन स्टार खेळाडूंशिवाय जबरदस्त खेळ
पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने आपल्या तीन स्टार खेळाडूंशिवाय इतक जबरदस्त परफॉर्म केलय. टीमचा नियमित कॅप्टन केन विलियमसन दुखापतीमुळे हा सामना खेळत नव्हता. टीम साऊदी सुद्धा टीममध्ये नव्हता. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन इंग्लंड विरुद्ध प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. पण या तिघांशिवाय न्यूझीलंडच्या टीमने जबरदस्त खेळ दाखवला. सलामीवीर डेवॉन कॉन्वेने 152 धावा ठोकल्या. रचिन रवींद्रने नाबाद 123 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीममध्ये चांगले बॅकअप प्लेयर आहेत, हे त्यांनी दाखवून दिलय. टीम इंडियासाठी धोका कुठे आहे?
इंग्लंड आणि न्यूझीलंडचा सांमना अहमदाबादमध्ये झाला. हा पीच फलंदाजीसाठी अनुकूल मानला जातो. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेनरीने इंग्लंडच्या तुफानी फलंदाजांना धावा बनवण्यापासून रोखलं. टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट यामध्ये अशी आहे की, टीम इंडिया आणि न्यूझीलंडचा सामना 22 ऑक्टोबरला धर्मशाळा येथे होणार आहे. ही विकेट वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहे. त्यामुळे बोल्ट आणि हेनरी अशा विकेटवर जास्त घातक ठरतील.