IND vs NZ सामन्यात हार्दिक खेळण्याची शक्यता कमी, त्याच्याजागी ‘या’ दोन खेळाडूंना सुवर्ण संधी
IND vs NZ | हार्दिकच्या निमित्ताने 'या' दोन प्लेयरसाठी संधी निर्माण होऊ शकते. हार्दिक पांड्याला काल बांग्लादेश विरुद्ध गोलंदाजी करताना दुखापत झाली. त्याच्याजागी दुसरा पर्यायी खेळाडू शोधणं सोप नाहीय. कारण हार्दिक पांड्यामुळे टीमला बॅलन्स मिळतो.
पुणे : बांग्लादेश विरुद्ध दमदार विजयानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला आपला प्रमुख खेळाडू हार्दिक पांड्याशिवाय खेळाव लागू शकतं. हार्दिक पांड्याला काल बांग्लादेश विरुद्ध गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. डॉक्टरांनी हार्दिकला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे, त्या बद्दल अजून नेमकी माहिती दिलेली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. हार्दिक पांड्या रविवार सकाळपर्यंत फिट झाला नाही, तर त्याच्याजागी टीम इंडियात दोघांना संधी मिळू शकते. कारण कॅप्टन रोहित शर्माकडे हार्दिक पांड्याच्या तोडीचा पर्यायी खेळाडू नाहीय. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम इंडियाला आपल्या रणनितीत बदल करावा लागेल. हार्दिक पांड्याच्या जागी दोन खेळाडूंना यासाठी घ्याव लागणार. कारण, 6 व्या नंबरवर तसा फलंदाज नाहीय तसच 10 ओव्हर्स टाकणाऱ्या वेगवान गोलंदाजाची कमतरता जाणवेल. हार्दिक पांड्या या दोन्ही जबाबदाऱ्या सांभळतो. त्याच्यामुळे टीम इंडिया बॅलन्स होते.
बांग्लादेश विरुद्ध पहिली ओव्हर टाकताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. टीमसाठी हा झटका होता. त्याने पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर मैदान सोडलं. लगेच त्याला रुग्णालयात नेऊन स्कॅन करण्यात आल. सध्या टीम इंडियात पहिले पाच फलंदाज जबरदस्त कामगिरी करतायत. त्यामुळे हार्दिक पांड्याला फलंदाजीतील कौशल्य दाखवण्याची संधी मिळालेली नाही. तो वेगवान गोलंदाज म्हमून टीममध्ये खेळतोय. 3 सामन्यात त्याने 5 विकेट काढले आहेत. हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नसेल, तर त्याच्याजागी दोन प्लेयरना संधी मिळेल. हार्दिकच्या जागी टीममध्ये येणारे ते दोघे कोण?
हे दोन्ही खेळाडू टॅलेंटेड आहेत. सध्याच्या टीम कॉम्बिनेशनमुळे त्यांना बाहेर बसाव लागतय. न्यूझीलंड विरुद्ध संधी ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असेल. दोघांना आपली उपयुक्तात सिद्ध करता येईल. हार्दिकच्या जागी 6 व्या नंबरवर फलंदाजासाठी सूर्यकुमार यादवची टीममध्ये निवड होऊ शकते. तेच बरेच दिवस बेंचवर बसून असलेल्या मोहम्मद शमीची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री होऊ शकते. शार्दुल ठाकूरने बांग्लादेश विरुद्ध 9 ओव्हरमध्ये 59 धावा दिल्या. ही चांगली बाब नाहीय. त्याच्यावर भरवसा नाही ठेवता येणार. त्याजागी मोहम्मद शमीकडे बराच मोठा अनुभव आहे.