ODI World Cup Qualifier Scenario : झिम्बाब्वे OUT, आता ‘या’ दोन टीमपैकी कोण खेळणार वर्ल्ड कप?

ODI World Cup Qualifier Scenario : श्रीलंकेच्या टीमने वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलय. पण दुसरी टीम अजून ठरलेली नाही. त्यासाठी सर्व खेळ सुरु आहे. गुरुवारी 6 जुलैला क्वालिफायरची एक मॅच होईल. त्याचा निकाल महत्वपूर्ण असणार आहे.

ODI World Cup Qualifier Scenario : झिम्बाब्वे OUT, आता 'या' दोन टीमपैकी कोण खेळणार वर्ल्ड कप?
ODI World Cup Qualifier ScenarioImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 8:35 AM

हरारे : वर्ल्ड कपच्या शर्यतीतून झिम्बाब्वेची टीम बाहेर गेली आहे. काल स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वेचा सामना झाला. या मॅचमध्ये झिम्बाब्वेला विजय आवश्यक होता. पण असं होऊ शकलं नाही. स्कॉटलंड विरुद्धचा सामना झिम्बाब्वेने 31 धावांनी गमावला. या पराभवामुळे भारतात येऊन वनडे वर्ल्ड कप खेळण्याच झिम्बाब्वेच स्वप्न भंग पावलं. आधी वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कपमधून आऊट झाली. आता झिम्बाब्वे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दोन्ही नावाजलेले संघ होते.

वर्ल्ड कप क्वालिफायरच्या सुपर सिक्स पॉइंट्स टेबलमध्ये सध्या झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडचे 6-6 पॉइंट्स आहेत. नेदरलँडसचे 4 अंक आहेत. झिम्बाब्वेची टीम लोअर रनरेटमुळे शर्यतीतून बाहेर गेली आहे. आता सर्व खेळ स्कॉटलंड आणि नेदरलँड्स या दोन टीममध्ये आहे.

एक टीम कन्फर्म, दुसरी कुठली?

क्वालिफायर राऊंडमध्ये टॉपवर असणाऱ्या दोन टीम्स वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार आहेत. श्रीलंकेच्या टीमने आधीच आपल तिकीट पक्क केलं आहे. पण दुसरी टीम कुठली? ते अजून ठरलेलं नाही. गुरुवारी 6 जुलैला स्कॉटलंड आणि नेदरलँड्सच्या टीममध्ये होणारी मॅच महत्वाची आहे.

विजयाच मार्जिन महत्वाच

6 जुलैला होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्सच्या टीमने स्कॉटलंडला पराभूत केलं, तर त्यांचे 6 पॉइंट्स होतील. अशावेळी स्कॉटलंड आणि नेदरलँड्समध्ये पुढे कुठली टीम जाणार? नेदरलँड्सच्या टीमने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यास विजयाच मार्जिन काय असेल? ते सुद्धा महत्वाच ठरणार आहे.

दोन्ही टीमसाठी पुढचा मार्ग कसा असेल?

नेदरलँड्सच्या टीमने 250 धावा करुन 83 धावांच्या फरकाने हरवलं, तर स्कॉटलंडचा रनरेट झिम्बाब्वेपेक्षा अजून खाली जाईल. अशावेळी नेदरलँड्सच्या टीमला भारतात वनडे वर्ल्ड कप खेळण्याच तिकीट मिळेल.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

वर्ल्ड कपच तिकीट मिळवण्यासाठी सगळा रनरेटचा खेळ

स्कॉटलंडने नेदरलँड्सला हरवलं, नेदरलँड्सच्या पराभवाच मार्जिन 31 रन्सपेक्षा जास्त नसेल, तर अशा स्थितीत नेदरलँड्सच्या टीमला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळेल.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

32 रन्सनी हरवाव लागेल

नेदरलँड्सच्या टीमने 250 धावा करुन त्यांनी स्कॉटलंडच्या टीमला 31 धावांनी हरवलं, तरी त्यांना वर्ल्ड कपच तिकीट मिळणार नाही, त्यांना स्कॉटलंडला 32 धावांनी पराभूत कराव लागेल. कारण त्याचवेळी स्कॉटलंडपेक्षा नेदरलँड्सचा रनरेट सरस होईल.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.