Suryakumar Yadav: वनडेमध्ये यशासाठी सूर्यकुमारला काय करावं लागेल? रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav: रवी शास्त्रींनी सूर्याला खूप साध्या पण मोलाच्या टीप्स दिल्यात....
मुंबई: सध्या सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमारने आपली प्रतिभा दाखवून दिली. टी 20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवला रोखणं कुठल्याही गोलंदाजासाठी मोठ चॅलेंज आहे. ICC च्या टी 20 फॉर्मेटमधील तो नंबर एक फलंदाज असून यावर्षात त्याने टी 20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमारने T20 मध्ये दोन शतकं झळकावताना अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत.
स्टम्पसच्या समोर कमी आणि मागे जास्त धावा
टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे विरुद्ध सूर्याने जबरदस्त बॅटिंग दाखवली. सूर्याच्या टी 20 मधील बॅटिंग कौशल्याला तोड नाहीय. तो स्टम्पसच्या समोर कमी आणि मागे जास्त धावा करतो. महत्त्वाच म्हणजे तो ज्या पद्धतीची बॅटिंग करतो, त्याला मिस्टर 360 म्हणतात. थर्ड मॅन, फाईन लेगला स्कूप शॉट खेळण्यावर त्याची हुकूमत आहे. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर त्या वेगाचा तो खूप चांगला उपयोग करतो.
सूर्या अशी बॅटिंग कशी करु शकतो?
महत्त्वाचं म्हणजे सूर्या चौकार, षटकर अगदी सहज मारतो. त्यात ताकत नसते. सूर्या अशी बॅटिंग कशी करु शकतो? असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. सूर्या टी 20 क्रिकेटमध्ये जितका यशस्वी आहे, तितका वनडेमध्य नाही. वनडेमध्ये त्याच्या बॅटिंगमध्ये ते कौशल्य दिसत नाही.
त्याच फॉर्मला वनडेमध्ये काय झालं?
नुकतीच न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका संपली. टीम इंडियाचा या सीरीजमध्ये 1-0 ने पराभव झाला. याच न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 मध्ये सूर्याने सहज शतक झळकावलं होतं, त्याच फॉर्मला वनडेमध्ये काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ऑकलंड आणि ख्राइस्टचर्च या दोन वनडेमध्ये सूर्या एकाच पद्धतीने आऊट झाला.
काही गोष्टींमध्ये सुधारणेची गरज
ऑकलंडमध्ये लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर त्याने फिन एलनकडे स्लीपमध्ये झेल दिला. ख्राइस्टचर्चमध्ये एडम मिल्नेच्या गोलंदाजीवर तो अशाच पद्धतीने आऊट झाला. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी यावर आपलं मत मांडलय. सूर्यकुमारच्या वनडेमधील बॅटिंगमध्ये काही धोकादायक नाही किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त त्याला काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल.
सूर्याचा USP काय?
“टी 20 च्या तुलनेत वनडे अडीचपट मोठा खेळ आहे, हे सर्वप्रथम सूर्याने समजून घेतलं पाहिजे. त्याला खेळण्यासाठी बरेच चेंडू मिळतात. त्याने थोडी प्रतिक्षा केली पाहिजे. इनिंगच्या अखेरच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी हा त्याचा USP आहे. त्याला 30-40 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे त्याने स्वत:ला थोडा वेळ दिला पाहिजे” असं रवी शास्त्री म्हणाले.
आदर करायला शिकं
“तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलात, तरी तुम्ही परिस्थितीचा आदर केला पाहिजे. हा खूप सुंदर खेळ आहे. हा कोणासाठी थांबत नाही. तुम्ही परिस्थितीचा आदर केला नाही, तर पुढे-मागे तुम्हाला आदर करावा लागतो” असं शास्त्री प्राइम व्हिडिओवर म्हणाले.