तेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16 तास पाहिली होती वाट, नक्की काय घडलं होतं?

सूत्राच्या माहितीनुसार, उर्वशी त्यावेळी वाराणसीमध्ये आपल्या एका प्रोजेक्टची शूटिंग करत होती. शूटिंग शेड्यूल टाइट असल्यामुळे तिच्याकडे कोणालाही भेटण्यासाठी वेळ नव्हता.

तेव्हा Urvashi Rautela ला भेटण्यासाठी Rishabh Pant ने 16 तास पाहिली होती वाट, नक्की काय घडलं होतं?
उर्वशी रौतेला-ऋषभ पंत Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:27 PM

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जुनं आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असतात. अगदी 70-80 च्या दशकापासून हे सुरु आहे. अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंचं अफेअर विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचल्याची फार कमी उदहारण आहेत. शर्मिला टागोर-मन्सूर अली खान पतौडी, अगदी अलीकडच्या काही वर्षातलं उदहारण द्यायचं झाल्यास अनुष्का शर्मा-विराट कोहलीचं (Virat kohli) देता येईल. भारतात बॉलिवूड आणि क्रिकेटला ग्लॅमर आहे. त्यामुळे मीडियामध्ये या जोड्यांना बरीच प्रसिद्धी मिळते. टीम इंडियाचा आक्रमक डावखुरा फलंदाज ऋषभ पंतचं (rishabh pant) नाव काही वर्षांपूर्वी असंच बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (urvashi rautela) बरोबर जोडलं गेलं होतं. दोघांच्या अफेअरची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली होती. दोघांच्या रोमँटिक लव्ह स्टोरीबद्दल बरंच लिहिलं गेलं होतं. वर्ष 2019 मध्ये दोघांना एकत्र पहाण्यात आलं होतं.

ऋषभ पंत थेट वाराणसीला गेला

दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं बोललं जायचं. ऋषभ आणि उर्वशी दोघांपैकी कोणीही या बद्दल कधीच मीडियामध्ये काही बोललं नाही. काही रिपोर्ट्सनुसार ऋषभने उर्वशीला भेटण्यासाठी तब्बल 16 तास वाट पाहिली होती. उर्वशीला भेटण्यासाठी ऋषभ तब्बल इतके तास थांबल्याचं आज तकने वृत्त दिलं आहे. सूत्राच्या माहितीनुसार, उर्वशी त्यावेळी वाराणसीमध्ये आपल्या एका प्रोजेक्टची शूटिंग करत होती. शूटिंग शेड्यूल टाइट असल्यामुळे तिच्याकडे कोणालाही भेटण्यासाठी वेळ नव्हता. ऋषभला जेव्हा कळलं की, उर्वशी वाराणसीत आहे, तेव्हा त्याने तिथे जाऊन तिला भेटण्याचा निर्णय घेतला.

एकत्रित फोटो का नाही?

ऋषभ त्यावेळी उर्वशीला भेटण्यासाठी तब्बल 16 ते 17 तास थांबला होता. उर्वशी आणि ऋषभमध्ये नातं असतं, तर त्यांचा एकत्रित फोटो समोर आला असता. पण असं काहीच घडलं नाही, असंही सूत्राचं म्हणणं आहे. काही वेळाने दोघे विभक्त झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

उर्वशी कुठे दिसली होती?

उर्वशी रौतेलाला मागच्यावेळी मिस यूनिवर्स 2021 च्या प्लॅटफॉर्मवर जज म्हणून पाहण्यात आले होते. मिस यूनिवर्स 2021 हरनाज सिंधूच्या विजयावर तिने आनंदही व्यक्त केला होता. उर्वशी लवकरच ‘इंस्पेक्टर कविनाश’ या वेब सीरीजमध्ये रणदीप हुड्डासोबत काम करताना दिसणार आहे. त्याशिवाय ‘Thiruttu Payale 2’ चा हिंदी रिमेक ‘ब्लॅक रोज’मध्ये ती लीड रोलमध्ये दिसेल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.