IND vs SA 1st ODI: जिंकणारा सामना कसा हरायचा, ते भारताकडून शिका

खरंतर दक्षिण आफ्रिकेच्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली. कॅप्टन केएल राहुल (12) धावांवर बाद झाला. पण त्याने धवनसोबत 46 धावांची भागीदारी केली.

IND vs SA 1st ODI: जिंकणारा सामना कसा हरायचा, ते भारताकडून शिका
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 10:15 PM

पार्ल: कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (oneday series) भारताचं निराशाजनक प्रदर्शन सुरु आहे. आज पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवन (79) (Shikhar dhawan) विराट कोहलीचा (51) (Virat kohli) आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही.  त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या. शार्दुलने अखेरच्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली. पण तो पर्यंत उशीर झाला होता. खरंतर दक्षिण आफ्रिकेच्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली. कॅप्टन केएल राहुल (12) धावांवर बाद झाला. पण त्याने धवनसोबत 46 धावांची भागीदारी केली.

काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी वाया घालवली

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटने संयमी फलंदाजी केली. त्याने शिखर सोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावंची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर भारताचा डाव गडगडला. धावफलकावर 138 धावा असताना शिखर धवन बाद झाला. डावखुरा गोलंदाज केशव महाराजचा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला आणि धवन क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर विराटही खेळपट्टीवर फार वेळ टिकला नाही. (51) धावांवर शम्सीच्या गोलंदाजीवर त्याने बावुमाकडे झेल दिला. हे दोघे बाद झाल्यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि पदार्पण करणाऱ्या वेंकटेशन अय्यरकडून अपेक्षा होत्या. पण तिघेही स्वस्तात बाद झाले. खरंतर या युवा खेळाडूंना आज काहीतरी करुन दाखवण्याची चांगली संधी होती.

तो पर्यंत वेगाने धावा येत होत्या

शिखर आणि विराट खेळपट्टीवर असेपर्यंत वेगाने धावा येत होत्या. भारत दक्षिण आफ्रिकेचे 297 धावांचे लक्ष्य सहज पार करेल असे वाटत होते. पण कसोटीप्रमाणे इथे सुद्धा एक जोडी तुटल्यानंतर संघाचा डोलारा कोसळला. त्याआधी टेंबा बावुमा (110) आणि डुसेच्या नाबाद (129) धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने बोलँड पार्कच्या मैदानावर 297 धावांचे लक्ष्य उभारले. बुमराह, ठाकूर, भुवनेश्वर या गोलंदाजांच बावुमा-डुसे जोडीपुढे काही चाललं नाही.

one day series india lost first one day against south Africa at boland park

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.