Cricket | सचिन तेंडुलकर-युवराज सिंह पुन्हा एकदा मैदानात, सामना केव्हा आणि कुठे?
One World One Family Cup 2024 Live Streaming | क्रिकेट विश्वातील अनेक माजी दिग्गज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाले आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल हे जाणून घेऊयात.
मुंबई | क्रिकेट टीम इंडियाचे माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. वन वर्ल्ड वन फॅमिली कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वन वर्ल्ड विरुद्ध वन फॅमिली या संघांमध्ये हा सामना होणार आहे. सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह या दोघांचे संघ एकमेकांसमोर भिडणार आहे. वन वर्ल्ड टीमचं नेतृत्व सचिन तेंडुलकर करणार आहे. तर वन फॅमिलीच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवराज सिंह याच्याकडे आहे. हा चॅरिटी सामना असणार आहे.
वन वर्ल्ड आणि वर्ल्ड कप या दोन्ही संघांमध्ये विविध संघातील दिग्गज माजी खेळाडू सहभागी आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना एकाप्रकारे आयपीएल प्रमाणेच हा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा दिग्गज खेळाडू हे सज्ज झाले आहेत. हा सामना कुठे आणि कधी पाहता येणार, हे जाऊन घेऊयात.
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना कधी?
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना हा 18 जानेवारी रोजी होणार आहे.
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामन्याला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना कुठे?
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना हा कर्नाटकातील सत्य साई ग्राम स्टेडियममध्ये आयोजि करण्यात आला आहे.
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना कुठे पाहता येणार?
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
वन वर्ल्ड वन फॅमिली स्पर्धेतील सामना युट्युब चॅनेलच्या माध्यमातून मोबाईलवर पाहता येईल. हा सामना Sri Madhusudan Sai Global Humanitarian Mission या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.
वन वर्ल्ड टीम | सचिन तेंदुलकर (कॅप्टन), नमन ओझा, उपुल थरंगा, अल्विरो पीटरसन, सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठान, अशोक डिंडा, अजंता मेंडिस, हरभजन सिंह, मोंटी पनेसर, आरपी सिंह आणि डैनी मॉरिसन.
वन फॅमिली टीम | युवराज सिंह (कर्णधार), पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, डैरेन मैडी, आलोक कपाली, रोमेश कालूविथराना, यूसुफ पठान, जेसन क्रेजा, मुथैय्या मुरलीधरन, मखाया एंटिनी, चामिंडा वास आणि वेंकटेश प्रसाद.