IND VS NZ, 2nd Test : मागच्या मॅचमध्ये 0 वर आऊट तरीही मुंबईच्या कसोटीत संधी?
गेल्या कसोटी सामन्यावेळी आराम करत असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटीत परतणार आहे. त्यामुळे एका खेळाडुला बाहेर बसावं लागणार आहे. तो खेळाडू कोण असणार हे अजूनही निश्चित नाही.
मुंबई : न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताने टि-20 सिरीजमध्ये न्यूझीलंडला धूळ चारली, मात्र पहिल्या कसोटीत भारताला विजय मिळवता आला नाही. कानपूरचा कसोटी सामना अनिर्णत राहीला. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता मुंबईच्या कसोटी सामन्यावर आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीम जोर लावताना दिसणार आहेत, कारण हा सामना जो जिंकेल सिरीजही त्याच्या नावावर होणार आहे. त्यामुळे भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाण्याची दाट शक्यता आहे.
कोण संघातून बाहेर जाणार?
गेल्या कसोटी सामन्यावेळी आराम करत असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली मुंबई कसोटीत परतणार आहे. त्यामुळे एका खेळाडुला बाहेर बसावं लागणार आहे. तो खेळाडू कोण असणार हे अजूनही निश्चित नाही. मात्र भारतीय गोलंदाजीच्या कोचकडून दोन मोठ्या बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. राहणे, किंवा पुजारापैकी एकाला बाहेर बसवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणती प्लेइंग 11 मैदानात उतरणार याचे वेध क्रिकेट चाहत्यांना लागले आहेत.
ऋद्धिमान साहा बाहेर होणार?
भारताचा विकेटकिपर बॅट्समन ऋद्धिमान साहा पुढच्या कसोटीत बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. ऋद्धिमान साहाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळाबाबत अनिश्चिता आहे. त्यामुळे के. एस. भरतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. केएस भरतने आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशसाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र तो खेळलेल्या त्याच्या शेवटच्या सामन्यात 0 रनवरती बाद झाला होता. ऋद्धिमान साहाच्या फिटनेसबद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईच्या कसोटीत कोण उतरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.