ODI World Cup 2023 | पाकिस्तानची नाटक कधी संपणार? त्यांच्या क्रीडा मंत्र्याने भारताला दिली धमकी
India vs Pakistan | भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. येत्या 15 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅच होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला या मॅचची प्रतिक्षा आहे.
नवी दिल्ली : भारतात यावर्षी वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानची नाटकं अजून सुरुच आहेत. पाकिस्तानकडून दरदिवशी काही ना काही स्टेटमेंट केलं जातय. रविवारी पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान मजारी यांनी धमकीची भाषा केली. “टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर आम्ही सुद्धा आमच्या टीमला वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात पाठवणार नाही. आम्ही वर्ल्ड कपमधून आमचं नाव मागे घेऊ” असं टोकाच वक्तव्य मजारी यांनी केलय.
पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक पाऊल उचललय. त्यानंतर पाकिस्तानी क्रीडा मंत्र्यांनी हे वक्तव्य केलय. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी टीमच्या सहभागाबाबत पाकिस्तानी पंतप्रधानांनी एक कमिटी बनवली आहे. पाकिस्तानी टीम भारतात येणार की, नाही याचा निर्णय ही कमिटी घेणार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
पाकिस्तानची मागणी काय आहे?
शरीफ यांनी जी कमिटी बनवलीय, त्यात परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि एहसानसह 11 मंत्री आहेत. “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्या मंत्रालयाच्या अंडर आहे. भारत आशिया कपचे सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळण्याची मागणी करत असेल, तर भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान सुद्धा अशीच मागणी करु शकतो” असं एहसान म्हणाले. “कमिटी या संपूर्ण विषयावर चर्ता करेल व पंतप्रधानांना सल्ला देईल” असं क्रीडा मंत्री म्हणाले.
An auspicious start as Mr. Zaka Ashraf chairs the first meeting of the PCB Management Committee at the National Cricket Academy. A pivotal step towards shaping future of #PakistanCricket. #PCBuild #ManagementCommittee #Cricket #AUSvsENG #SLvPAK #Zaporizhzhia #Threads #WahabRiaz pic.twitter.com/N5nZSyK9MZ
— Menahil (@Menahil_1) July 6, 2023
पाकिस्तानी कमिटी रिपोर्ट कधी सोपवणार?
भुट्टे यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढच्या आठवड्यात आपला रिपोर्ट् पंतप्रधानांना सादर करेल. याच दरम्यान, पीसीबीचे नवीन चेअरमन जका अशरफ दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या एका महत्वाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील. जय शाह आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष आहेत. या मीटिंगमध्ये आशिया कप आणि वर्ल्ड कपबद्दल चर्चा होऊ शकते. पीसीबीच्या माजी चेअरमनचा कुठला निर्णय नाही पटला?
आशिया कपच्या तारखांची घोषणा झाली आहे. पण अजून पूर्ण शेड्युल आलेलं नाही. एसीसीने पीसीबीसोबत मिळून निर्णय घेतला आहे. आशिया कपच 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे आयोजन होणार आहे. पीसीबीचे माजी चेअरमन नजम सेठी यांच्या कार्यकाळात झालेला एक निर्णय आपल्याला पटला नाही. पाकिस्तान आशिया कपचा आयोजक आहे. त्यांनी आपल्या देशात सर्व सामने आयोजित केले पाहिजेत, असं एहसान म्हणाले.