PAK vs ENG 1st Test: इंग्लंडचे रेकॉर्डवर रेकॉर्ड, 145 वर्षात जे झालं नाही, ते पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच दिवशी करुन दाखवलं
PAK vs ENG 1st Test: इंग्लंडने पहिल्यादिवशी जो खेळ केलाय, तो टेस्ट कमी आणि T20 क्रिकेट जास्त होतं....
लाहोर: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आजपासून ऐतिहासिक टेस्ट सीरीजला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने रेकॉर्ड्सची रांग लावली. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियममध्ये मॅच वेळेवर सुरु झाली. मॅचच्या आधी इंग्लिश टीममधील बहुतांश खेळाडू आजारी होते. त्यामुळे मॅच वेळेवर सुरु होण्याबद्दल प्रश्नचिन्ह होतं. पण मॅच सुरु झाल्यानंतर इंग्लिश फलंदाजांची तब्येत आणखी सुधारली. त्यांनी पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. पहिल्याच दिवशी 100 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.
पहिल्याच दिवशी 75 ओव्हर्सचा खेळ
इंग्लिश टीम मागच्या 5 महिन्यांपासून टेस्ट क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालतेय. पाकिस्तानतही ते याच यशाच कित्ता गिरवतात का? याकडे क्रिकेट विश्वाच लक्ष आहे. इंग्लंडने तोच आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. सपाट पीचचा फायदा उचलून वेगाने धावा फटकावल्या. पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या टीमने 75 ओव्हर्समध्ये 506 धावा कुटल्या.
- इंग्लंडने पहिल्या दिवशी 4 विकेट गमावून 506 धावा केल्या. टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी पहिल्यांदाच कुठल्या टीमने 500 चा आकडा गाठून रेकॉर्ड केला. टेस्ट क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कमाल झालीय.
- कसोटीत पहिल्यादिवशी सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड 494 रन्स होता. 1910 साली सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. इंग्लंडने आज 75 ओव्हर्समध्येच हा रेकॉर्ड मोडला.
- इंग्लंडकडून जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप आणि हॅरी ब्रूकने कसोटीच्या पहिल्याच दिवशी चार शतकं ठोकली. कसोटी क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदा झालय. जेव्हा कुठल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 4 शतक झळकवण्यात आली.
- इंग्लंडसाठी ओपनिंग करणाऱ्या जॅक क्रॉलीने फक्त 86 चेंडूत शतक ठोकलं. इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट इतिहासात कुठल्याही ओपनरने केलेला वेगवान टेस्ट शतकाचा हा रेकॉर्ड आहे.
- करिअरमधला दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या हॅरी ब्रूकने फक्त 80 चेंड़ूत पहिलं कसोटी शतक झळकावलं. टेस्टमध्ये इंग्लंडकडून वेगवान शतक झळकवणारा तिसरा फलंदाज बनला.
- क्रॉली आणि बेन डकेटच्या ओपनिंग जोडीने फक्त 136 चेंडूत 150 धावांची ओपनिंग पार्टनरशिप पूर्ण केली. टेस्ट क्रिकेटमध्ये हा एक नवीन रेकॉर्ड आहे.
- क्रॉली आणि डकेटने मॅचच्या पहिल्या सेशनमध्ये एकही विकेट न गमावता 174 धावा केल्या. टेस्ट मॅचच्या पहिल्या सेशनमध्ये सर्वाधिक धावांचा हा नवीन रेकॉर्ड बनलाय.