PAK vs ENG: इंग्लंडने घरात घुसून पाकिस्तानला धुतलं, शेवटच्या सामन्यात काय घडलं?
PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सात सामन्यांची T20 सीरीज खूपच रोमांचक झाली. अखेरच्या सामन्यापर्यंत उत्सुक्ता ताणली गेली होती.
मुंबई: इंग्लंडची टीम पाकिस्तानात कधी येणार? यासाठी पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींनी तब्बल 17 वर्ष वाट पाहिली. अखेर इंग्लंडचा संघ पाकिस्तात दौऱ्यावर आला. पण आज पाकिस्तानी क्रिकेट चाहते मात्र निराश आहेत. इंग्लंडची टीम पाकिस्तानात टी 20 सीरीज खेळली. त्यामुळे फॅन्सना आनंदी होण्याची संधी मिळाली. पण जाता-जाता त्यांनी यजमानांना जोरदार झटका दिला.
पाकिस्तानी चाहते निराश
सात मॅचच्या सीरीजमधील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 67 धावांनी हरवलं. मॅच सोबतच त्यांनी ट्रॉफी सुद्धा जिंकली. त्यामुळे पाकिस्तानी चाहते निराश झाले.
एकतर्फी सामना
टी 20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तान-इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या या सीरीजवर सगळ्यांच्या नजरा होत्या. कराचीमधील चार आणि लाहोरमधील पहिल्या दोन सामन्यापर्यंत दोन्ही टीम्समध्ये 3-3 अशी बरोबरी होती. शेवटच्या मॅचमध्ये मात्र एकतर्फी सामना झाला. पाकिस्तानच्या बॅटिंग आणि फिल्डिंगची पोल-खोल झाली.
पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सीरीजमधील शेवटचा निर्णायक सामना झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. प्रत्येक प्लेयरने छोटी पण वेगवान खेळी केली. डेविड मलान 47 चेंडूत नाबाद 78 धावा. हॅरी ब्रुक 29 चेंडूत नाबाद 46 धावा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
इंग्लंडची मोठी धावसंख्या
इंग्लंडने 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 209 धावा मोठी धावसंख्या उभारली. इंग्लंडच्या चांगल्या फलंदाजीबरोबर पाकिस्तानने खराब फिल्डिंग केली. कॅप्टन बाबर आजमने स्वत: दोन कॅच सोडल्या.
पाकिस्तानने किती धावा केल्या?
बॅटिंगमध्ये पाकिस्तानचा फ्लॉप शो कायम होता. कॅप्टन बाबर आजम (4) आणि मोहम्मद रिजवान (1) रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 142 धावाच केल्या. इंग्लंडने 67 धावांनी सामन्यासह 4-3 अशी सीरीज जिंकली.