PAK vs ENG: मायदेशात पाकिस्तानची लाज निघाली, बाबर सेनेचा उडाला धुव्वा
PAK vs ENG: पाकिस्तानी भूमीवर इंग्लंडने पहिल्यांदा हे करुन दाखवलं.
कराची: इंग्लंडच्या टीमने कराची टेस्ट जिंकली आहे. यजमान पाकिस्तानला त्यांनी तिसऱ्या आणि सीरीजच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 8 विकेटने हरवलं. 3 कसोटी सामन्यांच्या सीरीजमध्ये इंग्लंडने क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. पाकिस्तानी भूमीवर इंग्लंडने पहिल्यांदाच क्लीन स्वीप केलय. कराची कसोटीत पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 167 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. इंग्लंडने शेवटच्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये हे लक्ष्य गाठलं.
शेवटच्या दिवशी गाठलं लक्ष्य
कराची कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 55 धावा करायच्या होत्या. त्यांच्या 8 विकेट बाकी होत्या. बेन स्टोक्स आणि बेन डकेट क्रीजवर होते. शेवटच्या दिवशी कुठलाही विकेट न गमावता इंग्लंडने या 55 धावा केल्या. पाकिस्तानचा पराभव झाला.
कराचीमध्ये इंग्लंडची कमाल
या विजयासह इंग्लंडने वर्ष 2022 मध्ये खेळलेल्या 10 कसोटी सामन्यात 9 वा विजय मिळवला आहे. ही तीच इंग्लंडची टीम आहे, ज्यांनी 17 कसोटी सामन्यात फक्त 1 विजय मिळवला होता. ब्रँडन मॅक्कलम आणि बेन स्टोक्स यांच्या कार्यकाळात इंग्लंड टीमचा कसोटी क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याचा परिणाम थेट दिसून येतोय.
England win the third Test by eight wickets.#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/EMwiQeqb0Z
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 20, 2022
इंग्लंडने अशी जिंकली कराची टेस्ट
कराची कसोटीत पाकिस्तानने पहिली बॅटिंग केली. पहिल्या डावात त्यांनी 304 धावा केल्या. इंग्लंडने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 354 धावा केल्या. त्यांना 50 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्याइनिंगमध्ये पाकिस्तानचा डाव 216 धावात आटोपला. इंग्लंडला विजयासाठी 167 धावांच लक्ष्य मिळालं. ते त्यांनी शेवटच्या दिवशी पार केलं.