Babar Azam-मोहम्मद रिजवानची नाचक्की झाल्यानंतर सर्वत्र ऋषभ पंतची चर्चा, जाणून घ्या काय घडलं?
Babar Azam News : ऋषभ तर क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे, मग बाबर-रिजवानची नाचक्की झाल्यावर त्याची इतकी चर्चा? 'द हंड्रेड' लीगमध्ये या दोघांना कोणीही विकत घेतलं नाही.
Babar Azam News : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आजम आणि त्याचा ओपनिंग जोडीदार मोहम्मद रिजवान दोघांनी नाचक्की झाली आहे. इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘द हंड्रेड’ लीगमध्ये या दोघांना कोणीही विकत घेतलं नाही. बाबर आणि रिजवान ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली दोन मोठी नावं आहेत. या बातमीनंतर टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतची एकच चर्चा आहे. ऋषभ पंतने या बातमीवर Reaction दिली, त्यामुळे तो चर्चेत आहे.
बाबर आणि रिजवानला द हंड्रेड लीगमध्ये कोणीही भाव दिला नाही. सोशल मीडियावर ही बातमी आगीसारखी पसरली. एक इंग्रजी क्रिकेट वेबसाइटने ही बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर ऋषभ पंतने या पोस्टला लाइक केलं. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ पंतची Reaction व्हायरल झालीय.
आफ्रिदीला मोठी किंमत
बाबर आणि मोहम्मद रिजवानला कोणीही विकत घेतलं नाही. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला लगेच विकत घेतलं. हॅरिस रौफ, एसहानुल्लाह सुद्धा या लीगमध्ये खेळताना दिसतील.
बाबरला कोणीच का नाही विकत घेतलं?
बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांची विक्री का नाही झाली? बाबर आणि रिजवान दोघेही पूर्ण सीजनसाठी उपलब्ध नाहीयत. हे कारण देण्यात आलय. त्यामुळे कोणी त्यांना विकत घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यांचा स्ट्राइक रेट सुद्धा चर्चेचा विषय आहे. हे दोन्ही प्लेयर T20 मध्ये मंदगतीने सुरुवात करतात. तीच गोष्ट त्यांच्या विरोधात गेली. सत्य काय आहे? ते टीम्सच सांगू शकतील. कोणीही खरेदीदार न मिळाल्यामुळे बाबर आजम आणि पाकिस्तान क्रिकेटच्या प्रतिमेला धक्का बसलाय. बाबरच शतक पण टीम हरली
अलीकडेच बाबर आजमच्या नेतृत्वावर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूलने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पीएसएलमध्ये एका सामन्यादरम्यान बाबर आजमने शतक ठोकलं. पण हे शतक झळकवण्यासाठी बाबर जास्त चेंडू खेळला अशी टीका सायमन डूलने केली. खेळाडूंनी रेकॉर्डसपेक्षा आपल्या टीमचा जास्त विचार केला पाहिजे असं डूलने म्हटल होतं.