T20 World Cup 2021 साठीच्या संघामध्ये पाकिस्तानकडून 3 बदल, माजी कर्णधारासह धाकड खेळाडू संघात, पाहा अंतिम 15

आगामी टी-20 विश्वचषकाला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या भव्य स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या 15 सदस्यायी संघाची घोषणा याआधीच केली होती. दरम्यान त्यांनी यामध्ये आता तीन बदल केले आहेत.

T20 World Cup 2021 साठीच्या संघामध्ये पाकिस्तानकडून 3 बदल, माजी कर्णधारासह धाकड खेळाडू संघात, पाहा अंतिम 15
पाकिस्तान क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 7:56 PM

कराची :  बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. काही दिवसांतच या स्पर्धेचा थरार युएईत पाहायला मिळणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत असून काही संघानी आपले अंतिम खेळाडूंची घोषणाही केली आहे. बऱ्याच आधी 15 सदस्यीय संघाची घोषणा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket) त्यांच्या संघात तीन बदल केले आहेत.

यामध्ये एक बदल म्हणजे पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक ठोकणारा एकमेव खेळाडू फखर जमान (Fakhar Zaman) याला राखीवमधून 15 सदस्यीय संघात जागा देण्यात आली आहे. याशिवाय संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) आणि हैदर अली (Haider Ali) यांनाही 15 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. सरफराज अहमद याला आजम खान आणि हैदर अलीला मोहम्मद हसनैन यांच्या जागेवर घेण्यात आलं आहे. तर  फखर जमानला खुशदिल शाहच्या जागी खेळायची संधी मिळाली आहे. आता खुशदिल शाह राखीव खेळाडूंमध्ये असेल.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा 15 सदस्यीय संघ :

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, सरफराज अहमद, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, फखर जमान, मोहम्मद हफीज, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : खुशदिल शाह, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

2 वर्षानंतर भारत, पाकिस्तान आमने-सामने

टी20 विश्वचषकाच्या गटामध्ये भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणदे हे दोन्ही संघ तब्बल 2 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने असतील. याआधी 2019 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने होती. ज्यावेळी भारताने 89 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा

T20 World Cup 2021 च्या दृष्टीने टीम इंडियाची मोठी घोषणा, 13 ऑक्टोबरला अवतरणार नव्या रुपात

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(Pakistan Cricket announces new changes in 15 member team for ICC Mens T20 World Cup 2021 with adding Haider Ali, Fakhar Zaman, and Sarfaraz Ahmed in team)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.