IND vs PAK: भारतात दिवाळी पण पराभवानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं? पहा VIDEO
बाबर आजमला गटबाजी उफाळून येण्याची भिती, तो एकच गोष्ट वारंवार सांगत होता....
मेलबर्न: भारतीयांसाठी यंदाची दिवाळी खास आहे. कारण काल टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) विजय मिळवला. या विजयाच स्टेडियमसह संपूर्ण भारतात सेलिब्रेशन झालं. त्याचवेळी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये (Pakistan Dressing Room) उदासी, खिन्नता, नैराश्याचा माहोल होता. खूप काहीतरी वाईट घडलय, असं चित्र होतं. पराभवानंतर पाकिस्तानी ड्रेसिंग रुममध्ये स्मशान शांतता पसरली होती.
पाकिस्तानला शॉक
PCB कडून पाकिस्तानी खेळाडूंच्या जल्लोशाचे, सेलिब्रेशनचे फोटो व्हिडिओ पोस्ट होत असतात. काल मात्र सर्व खेळाडू शांत बसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत होतं. नैराश्य, उदासी, खिन्नतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. टीम इंडियाने मिळवलेल्या विजयाचा पाकिस्तानला शॉक बसणं स्वाभाविक आहे. कारण एकवेळ ते सहज सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये होते. पण विराट आणि हार्दिकने जोडीने त्यांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला.
जणू टी 20 वर्ल्ड कपच गमावलाय असं वाटलं
हा व्हिडिओ पाहून पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममध्ये काल काय माहोल होता, या पराभवाचा त्यांच्या टीमवर काय परिणाम झालाय, ते दिसून आलं. काही खेळाडू डोकं पकडून बसले होते. पाकिस्तानी ड्रेसिंग रुममधलं दृश्य पाहून त्यांनी मॅच नाही, जणू टी 20 वर्ल्ड कपच गमावलाय असं वाटलं.
आजमच्या शब्दानंतरही पाकिस्तानी खेळाडू थंडच
या व्हिडिओमध्ये आधी मॅथ्यू हेडनने खेळाडूंना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॅप्टन बाबर आजमने भाषण दिलं. फक्त एक मॅच हरलोय, टी 20 वर्ल्ड कप नाही, या कॅप्टन बाबर आजमच्या शब्दानंतरही पाकिस्तानी खेळाडू थंडच होते.
“We win as one and lose as one!”
Listen what Matthew Hayden, Babar Azam and Saqlain Mushtaq told their players following a heartbreaking loss in Melbourne.#T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/suxGf34YSe
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2022
बाबरच्या मनात एकच भिती
बाबर आजम एकच गोष्ट वारंवार सांगत होता, आपण कोणा एकामुळे मॅच हरलेलो नाही, आपण सगळे मॅच हरलोय, कोणा एकाला पराभवासाठी दोष देऊ नका. आपण सगळे मिळून जिंकणार आहोत, असं आजम या खेळाडूंना सांगत होता. बाबरच्या बोलण्यावरुन पाकिस्तानी टीमध्ये गटबाजी उफाळण्याची भिती त्याला वाटत असावी, असंच वाटलं .म्हणून तो कोणा एकाला दोष देऊ नका यावर जोर देत होता.