T20 World Cup 2021 पाकिस्तानचा संघ सज्ज, भारताविरुद्ध सामन्यात तब्बल 7 गोलंदाज, काय आहे नेमकी रणनीती?

आगामी टी-20 विश्वचषकाला सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या भव्य स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेटने त्यांच्या 15 सदस्यायी संघाची घोषणा याआधीच केली होती. दरम्यान त्यांनी यामध्ये नुकतेच तीन बदल देखील केले.

T20 World Cup 2021 पाकिस्तानचा संघ सज्ज, भारताविरुद्ध सामन्यात तब्बल 7 गोलंदाज, काय आहे नेमकी रणनीती?
पाकिस्तान क्रिकेट टीम (प्रातिनिधीक फोटो)
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 7:56 PM

कराची :  बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. ग्रुप स्टेजमधील सामन्यांचा थरार युएईत सुरु देखील झाला आहे. तर भारत असलेल्या सुपर 12 गटाचे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्याआधी सुपर 12 मधील संघ सराव सामने खेळत आहेत. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी (India vs Pakistan) 24 ऑक्टोबर रोजी असून दोघांनी सराव सामन्यात तगडा विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने तर पाकिस्तानने वेस्ट इंडिजला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे.

वेस्ट इंडिजसारख्या तगड्या संघाला पराभूत करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यासाठी जबरदस्त रणनीती बनवण्यास सुरुवात केली असून समोर येणाऱ्या माहितीनुसार संघात अष्टपैलू खेळाडू मिळून तब्बल 7 गोलंदाज असणार आहेत. यामध्ये 3 मुख्य गोलंदाज तर 4 अष्टपैलू खेळाडू असतील. जियो टीवीशी बोलताना पाकिस्तान संघाशी संबधित एका विश्वासू सूत्राने दिलेल्या माहितीत, ‘भारताविरुद्ध सामन्यात पाकिस्तान अनुभवी खेळाडूंसह उतरणार आहे. जर यातील कोणी दुखापतग्रस्त असेल तर सराव सामन्याला उतरणारा संघच खेळू शकतो.

असा असू शकतो संघ

या संघामध्ये कर्णधार बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज आणि अनुभवी शोएब मलिकसह आसिफ अली यांना संधी मिळणं निश्तित आहे. तर अष्टपैलू खेळाडू शादाब खान आणि इमाद वसीम यांचीही वर्णी लागणार आहे. कारण वेस्ट इंडिजच्या सराव सामन्यात शादाबने 2  षटकात केवळ 7 धावा दिल्या तर इमादने 3 षटकात केवळ 6 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतल्या. या जबरदस्तसगोलंदाजीमुळे या दोघांना घेणं जवळपास निश्चित आहे. तर मुख्य गोलंदाज म्हणून शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ खेळतील. या तिघांनी वेस्ट इंडिजच्या सराव सामन्यात प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य पाकिस्तानी संघ – बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन शाह अफरीदी, हसन हली आणि हारिस रऊफ.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

T20 World Cup च्या सराव सामन्यात भारताचा विजय, पण संघ व्यवस्थापनाच्या डोकेदुखीत वाढ, कसे निवडणार अंतिम 11?

“भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा”, पाक खेळाडूंना PCBकडून लालच, उद्योजकाने ब्लँक चेक देण्याचं कबुल केल्याचा रमीज राजांचा दावा

BCCIच्या पैशावरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टिकून, PCB अध्यक्ष रमीज राजा यांनी सांगितली खरी परिस्थिती, व्हिडीओ व्हायरल

(Pakistan cricket team is ready for India vs Pakistan world cup match this will be pakistan probable 11)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.