Haider Ali T20 Blast : पाकिस्तानचा हैदर अली बघा कसा बालिशसारखा OUT झाला, Video Viral

Haider Ali T20 Blast : एकतर स्वत: चूक केली, वर दुसऱ्याला दोष देतो. Video बघितल्यावर तुम्ही सुद्धा म्हणाल याला एवढी साधी गोष्ट कशी कळली नाही.

Haider Ali T20 Blast : पाकिस्तानचा  हैदर अली बघा कसा बालिशसारखा OUT झाला, Video Viral
pakistan cricketer haider ali bizarre stumping in t20 blast tournamentImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 3:20 PM

लंडन : एका पाकिस्तानी खेळा़डूने इंग्लंडमध्ये मोठी चूक केली. एखादा बॅट्समन असा कसा आऊट होऊ शकतो? असा प्रश्न तुम्हाला पडेल. बॅट्समनच्या लक्षात आलं नाही, असं म्हणायला सुद्धा इथे फार वाव नाहीय. मैदानात जे काही घडलं, ते क्रिकेटच्या नियमांमध्ये बसणारं होतं. हैदर अली या पाकिस्तानी खेळाडू बरोबर हे सर्व घडलं. सध्या इंग्लंडमध्ये T20 ब्लास्ट टुर्नामेंट सुरु आहे. हैदर अली डर्बीशायरकडून खेळतोय.

बर्मिंघम बीयर्स आणि डर्बीशायरध्ये हा सामना होता. डर्बीशायरची फलंदाजी सुरु असताना हैदर अली बरोबर ही घटना घडली. हैदर अली टीमकडून ओपनिगसाठी आला होता. तो चांगला खेळत होता. पण त्याचवेळी मैदानात एक गोष्ट घडली. हैदर अली सुरुवातीला वाचला. पण नंतर जास्त हुशारी दाखवण्याच्या नादात फसला.

हे सुद्धा वाचा

आऊट झाला, ती पद्धत हैराण करणारी

तुम्ही विचार करत असाल, हैदर अली बरोबर मैदानात असं काय झालं? ही घटना हैदर अलीच्या बाद होण्याशी संबंधित आहे. 20 ओव्हरमध्ये डर्बीशायरसमोर 204 धावांच टार्गेट होतं. हैदर अलीने 34 चेंडूत 48 धावा फटकावल्या होत्या. त्याचवेळी तो स्टम्प आऊट झाला. एखादा फलंदाजाची क्रिकेटमध्ये स्टम्पिंग अजिबात नवीन नाहीय. पण हैदर अली ज्या पद्धतीने आऊट झाला, ते हैराण करणार आहे.

नेमकं घडलं काय?

बर्मिंघम बीयर्सकडून डॅनी ब्रिग्स गोलंदाजी करत होता. हैदर अली स्ट्राइकवर होता. ब्रिग्सचा चेंडू खेळण्यासाठी हैदर अली स्टेपआऊट झाला. अलीचा अंदाज चुकला. चेंडू विकेटकीपर एलेक्स डेविसच्या हातात गेला. त्याने बाद करण्याआधीच हैदर अली क्रीझमध्ये रिर्टन आला. त्यानंतर डेविसच्या हातात चेंडू असताना हैदर अली धाव घेण्यासाठी पळाला. तितक्यात डेविसने बेल्स उडवले.

इतकी बालिश चूक कशी करु शकतो?

हैदर अलीला सुदैवाने जीवनदान मिळालं होतं. मग तो धाव घेण्यासाठी का पळाला? चेंडू विकेटकीपरच्या ग्लोव्हजमध्ये आहे, एवढी साधी गोष्ट लक्षात आली नाही. इतकी बालिश चूक कशी करु शकतो? बाद झाल्यानंतर हैदर अली जशी विकेटकीपरने चूक केलीय, अशा अविर्भावत त्याच्याकडे पाहत होता. हैदर अली भले आऊट झाला. पण त्याची टीम जिंकली. डर्बीशायरने बर्मिंघम बीयर्सला 6 विकेटने हरवलं. त्यांनी 19.3 ओव्हर्समध्ये 204 धावांच लक्ष्य चेस केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.