अवघ्या 16 व्या वर्षी शेवटचा कसोटी सामना, मग कितव्या वर्षी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये केलं पदार्पण?

क्रिकेट जगतात कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्यांचे बरेच किस्से आपण ऐकले आहेत. पण या खेळाडूने तर अवघ्या 16 वर्षाच्या वयात शेवटची टेस्ट खेळली होती.

अवघ्या 16 व्या वर्षी शेवटचा कसोटी सामना, मग कितव्या वर्षी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्ये केलं पदार्पण?
खालिद हसन
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 12:15 PM

लंडन : प्रत्येक क्रिकेटपटूला आपल्या देशाकडून क्रिकेट खेळनं ही सर्वांत मानाची गोष्ट असते. हा मान लवकरात लवकर मिळावा यासाठी क्रिकेटर्स जीवाचं रान करतात. दरम्यान आम्ही तुम्हाला सांगितले की एक खेळाडू 17 वर्षांचा होण्यापूर्वीच त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली तर…हे वाचून तुम्हाला वाईट वाटेल. पण विचार करायला लावणारी गोष्ट ही देखील आहे की, 17 वर्षांचा होण्याआधी क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या खेळाडूने पदार्पण कितव्या वर्षी केलं असेल. (Pakistan Cricketer Khalid Hasan made his test Debut Against England at Age of 16 on this day)

तर ही सर्व चर्चा होत असलेल्या खेळाडूचे नाव आहे खालिद हसन (Khalid Hasan). खालिद हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू असून ते आता या जगात नाहीत. पण त्यांचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण आणि शेवट यामुळे ते कायम स्मरणात आहेत. खालिद यांनी 1954 मध्ये इंग्लंड विरोधात आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. पदार्पण करताना खालिद यांच वय 16 वर्षे 352 दिवस इतकं होतं. नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ते सर्वात कमी वयात पदार्पण करणारे खेळाडू ठरले होते. पहिल्याच टेस्टमध्ये खालिद यांनी शेवटच्या फळीत येऊन 17 धावा करत गोलंदाजीत 2 महत्त्वात्या फलंदाजाच्या विकेट्सही घेतल्या.

चार दिवसांत आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात

आपल्या सलामीच्या सामन्यात खालिद हे पाकिस्तान संघातील दुसरे यशस्वी गोलंदाज ठरले होते. 116 धावा देत त्यांनी दोन महत्त्वाचे विकेट्स पटकावले होते. मात्र तरीदेखील पहिला सामनाच त्यांचा शेवटचा सामना ठरला. त्यामुळे अवघ्या एका कसोटी सामन्यानंतरच खालिद यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली. त्यांनी 16 वर्षे 352 दिवसाचे असताना पदार्पण केले आणि 16 वर्षे 356 दिवसांचे असताना शेवटचा सामना खेळला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत त्यांची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली. खालिद हसन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 17 सामन्यांच 113 धावा करत 28 विकेट्स घेतले. सहा वर्षे ते प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.

हे ही वाचा –

ICC Test Rankings : न्यूझीलंड संघासह खेळाडूंची गरुडझेप, टॉप 10 मध्ये तीन भारतीय, ‘हा’ फलंदाज पहिल्या स्थानावर

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(Pakistan Cricketer Khalid Hasan made his test Debut Against England at Age of 16 on this day)

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.