IND vs PAK : जावेद मियाँदाद वाटेल ते बरळला, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
IND vs PAK : नैराश्यातून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वादग्रस्त वक्तव्य करतायत. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे.
Asia cup 2023 : सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB मध्ये वाद सुरु आहे. या वादाच कारण आहे, आशिया कप 2023 टुर्नामेंट. बीसीसीआयने आशिया कप 2023 स्पर्धेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. बहरीनमध्ये आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप 2023 स्पर्धा खेळण्यासाठी अजिबात पाकिस्तानात येणार नाही, असं स्पष्ट केलं. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यातून या सगळ्या वादाची सुरुवात झालीय. स्वत: पीसीबीच्या अध्यक्षांसह त्या देशातील क्रिकेटर्स भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने बोलताना सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.
PCB चं BCCI पुढे काही चालणार नाही
आशिया कप 2023 स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पण बीसीसीआयने टीम इंडिया पाकिस्तानात येणार नाही, असं सांगितलय. शनिवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. आशिया कप स्पर्धेचा वेन्यु काय असणार? याचा निर्णय पुढच्या महिन्यात होईल. बीसीसीआयच्या भूमिकेपुढे आपलं काही चालणार नाही, याची पाकिस्तानला पुरेपूर कल्पना आहे. क्रिकेटमध्ये बीसीसीआयची आर्थिक ताकत मोठी आहे. त्यामुळे पाकिस्तानला भारताचा निर्णय मान्य करावा लागेल. त्याच नैराश्यातून पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वादग्रस्त वक्तव्य करतायत. आशिया कप कुठे होणार? हा नंतरचा विषय आहे. त्या संदर्भात अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे.
‘आम्हाला फरक पडत नाही’
“पाकिस्तानला टिकून राहण्यासाठी भारताची आवश्यकता नाहीय. टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यासाठी येणार नसेल, तर त्याने आम्हाला फरक पडत नाही” असं जावेद मियाँदाद म्हणाला.
“Why is India afraid to play against Pakistan? They know if they lose to Pakistan, their public will not spare them. Narendra Modi will disappear, their public won’t leave him,” former Pakistan captain Javed Miandad.
— Farid Khan (@_FaridKhan) February 5, 2023
जावेद मियाँदादने काय वायफळ बडबड केली?
भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळायला घाबरतो, असा जावेद मियाँदादचा स्वत:चा तर्क आहे. “भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचमध्ये हरला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब होतील. जनता मोदींना सोडणार नाही” असं मियाँदाद म्हणाला. “पाकिस्ताकडून पराभव होत असल्याने भारताने शारजाहच्या मैदानातून पळ काढला होता. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय टीमच्या अडचणी वाढतात. तिथल्या मोठ्या खेळाडून नुकसान सोसाव लागतं” अशी वायफळ बडबड मियाँदादने केलीय.
आग कुठल्या घरांमध्ये लागते? टीव्ही कुठे फुटतात? हे क्रिकेट विश्वाला चांगला माहितीय. त्यामुळे जावेद मियाँदाद जे बोललाय, ते अजिबात गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उलट यात पाकिस्तानचा किती तिळपापड झालाय ते दिसतं.